Shambhuraj Desai : 'कोणतंही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेलं नाही, न्यायालयात आमची बाजू भक्कम'

कोणतेही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेले नाही. आमची बाजू न्यायालयात भक्कम आहे.
Shambhuraj Desai
Shambhuraj Desaiesakal
Updated on
Summary

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्र्यांना ते किती वेळा येवून भेटले हे विचारावे.

कऱ्हाड : कोणतेही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेले नाही. आमची बाजू न्यायालयात भक्कम आहे. कायदा, घटना आणि विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहून आम्ही आमची कृती केलेली आहे. त्यामुळं न्यायालयात आमची बाजू कायदेशीरपणे भक्कम आहे, अशी स्पष्टोक्ती उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत झालेल्या बंडातून त्यांनी भाजपच्या मदतीनं राज्यात सरकार स्थापन केलं आहे. या सत्तेला न्यायलयात आव्हान देण्यात आलं आहे. त्याचा निकाल लवकरच लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मंत्री देसाई हे कऱ्हाड (जि. सातारा) येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

मंत्री देसाई म्हणाले, 'बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना आणि धनुष्यबाणाची नियमानुसार, घटनेनुसार, निवडणूक आयोगाची मान्यता आमच्याकडं आहे. त्यामुळं शिवसेना ही आमचीच आहे. कोणतेही नियमबाह्य काम आम्ही 40 आमदारांनी केलेले नाही. आमची बाजू न्यायालयात भक्कम आहे. कायदा, घटना, विधीमंडळ नियमाच्या चौकटीत राहून आम्ही आमची कृती केलेली आहे. त्यामुळं न्यायालयात आमची बाजू कायदेशीरपणे भक्कम आहे.'

Shambhuraj Desai
Jiva Mahale : शिवरायांचे अंगरक्षक जिवा महालेंच्या वंशजाला मिसेस मुख्यमंत्र्यांची लाखमोलाची मदत

मुख्यमंत्री शिंदेंना कर्नाटकात कोणी ओळख नाही या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या टीकेवर मंत्री देसाई म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे प्रगत राज्याचे मुख्यमंत्री आहेत. अडचणीच्यावेळी मदतीला धावून जाणारा नेता म्हणून शिंदे यांची ख्याती आहे. राज्याचे मंत्री म्हणून त्यांनी अनेक वर्षे चांगले काम केले आहे. भारतीय जनता पक्षानं विनंती केल्यामुळं मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटकला प्रचारासाठी गेले होते. त्यांना तिथं ओळखतात. त्यांना मागणी होते, त्यामुळं मुख्यमंत्री शिंदे हे कर्नाटकला गेले होते. माजी उपमुख्यंत्री अजित पवार यांना तिथं मागणी नसेल, त्याची खंत त्यांच्या मनात असेल म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल असे वक्तव्य केले असेल, असंही त्यांनी सांगितलं.

Shambhuraj Desai
Karnataka Election : मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीच ! कॉंग्रेसने आणला शिवकुमार-सिद्धरामय्या यांच्या दोस्तीचा Video

विरोधी पक्षाच्या आमदारांना पालकमंत्री भेटत नाहीत, निधी देत नाहीत या अजित पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री देसाई म्हणाले, 'विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्र्यांना ते किती वेळा येवून भेटले हे विचारावे. अनेक राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे आमदार अनेकवेळा येवून आमच्या मंत्र्यांना मंत्रालयात भेटतात. मंत्रालयातील सीसीटीव्ही फुटेज काढून राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसचे किती आमदार आम्हाला मंत्रालयात येवून भेटले हे अजित पवार यांना दाखवू म्हणजे ते असे वक्तव्य करणार नाहीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.