सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं दिसत आहे.
सातारा : सध्या राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचं सत्र रंगल्याचं दिसत आहे. किरीट सोमय्या गेल्या अनेक दिवसांपासून ठाकरे सरकारवर नवनव्या आरोपांची टीकास्त्र डागत आहेत. तसंच, उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackeray) सरकार हे गुंड सरकार असल्याचं वक्तव्यही काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी केलं होतं. आता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी किरीट सोमय्यांचा चांगलाच समाचार घेतलाय. किरीट सोमय्यांकडं किती लक्ष द्यायचं, हे आता ठरवण्याची वेळ आलीय, असं म्हणत त्यांनी सोमय्यांवर निशाणा साधलाय.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीनं (ED) टाच आणल्यानंतर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेनेवर निशाणा साधलाय. संजय राऊत आणि त्यांच्या पत्नी गैरव्यवहार समोर आलंय. मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती. मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार असल्याचंही सोमय्या यांनी म्हंटलंय. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केलाय. या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), गृहमंत्री अमित शहा (Amit Shah), ईडी अधिकाऱ्यांचं अभिनंदन केलंय.
या संपूर्ण घटनाक्रमानंतर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी किरीट सोमय्यांवर पलटवार केलाय. ते म्हणाले, किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्याकडं किती लक्ष द्यायचं, हे आता ठरवायची वेळ आलीय. सोमय्या नेहमीच आरोप करत सुटतात. जुन्या कोणत्या तरी गोष्टी काढायच्या आणि त्यावर आरोप करायचं ही त्यांची सवय होऊन बसलीय. त्यामुळं शिवसेना (Shivsena) अशा तथ्यहिन आरोपांकडं फारसं लक्ष देत नाहीय, असा सणसणीत टोला शंभूराज देसाईंनी सोमय्यांना लगावला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.