"मोदी ठाकरेंना धाकटा भाऊ मानतात, त्यामुळे...";शंभुराज देसाईंची ऑफर

मूळची शिवसेना आमचीच, त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळणार असा विश्वासही शंभुराज देसाईंनी व्यक्त केला आहे.
Uddhav Thackeray  Narendra Modi
Uddhav Thackeray Narendra ModiSakal
Updated on

शिवसेनेचा ठाकरे आणि शिंदे गट हा वाद आता शिगेला पोहोचला आहे. दोन्ही गटांमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरुन वाद सुरू झाला आहे. खरी शिवसेना आमचीच आहे आणि धनुष्यबाण आम्हालाच मिळणार, असा दावा शिंदे गटातले शंभुराज देसाई यांनी केला आहे. तसंच उद्धव ठाकरेंनी थेट पंतप्रधान मोदींशी चर्चा करावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे. (Shambhuraj Desai Shivsena News)

Uddhav Thackeray  Narendra Modi
शिंदे-फडणवीसांचा आज दिल्ली दौरा; मोदी शाहांच्या भेटीत पुढचा प्लॅन ठरणार?

माध्यमांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, आम्ही हा उठाव केल आहे. आमचा गट हीच खरी शिवसेना (Shivsena) आहे. कारण आमच्याकडे दोन तृतीयांश लोकप्रतिनिधी आहेत. आम्ही सर्वांनी उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) विनंती केली होती की भाजपासोबत जाऊयात. पण ते ऐकलं नाही. त्यामुळे आम्हीच मूळ शिवसेना आहोत. आणि धनुष्यबाण हे चिन्हही आमचंच आहे, ते आमच्याच गटाला मिळणार. आता उद्धव ठाकरेंनाही ते पटलेलं आहे.

Uddhav Thackeray  Narendra Modi
शिंदे गटाच्या आमदाराचा बॅनरवर घोळ, दिघेंच्या जागी प्रसाद ओकचा फोटो

भाजपासोबत जायला हवं, असं आम्ही वारंवार सांगत होतो, असंही शंभुराज म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले की, आम्ही २०१९ पासून ठाकरेंना सांगत होतो की आपण भाजपासोबतच जायला हवं. आम्ही खूप प्रयत्न केला. शिंदे साहेबांनीही आग्रह केला. पण पक्षप्रमुखांच्या आदेशामुळे नाईलाजाने आम्हाला मविआमध्ये (Mahavikas Aghadi Government) राहावं लागलं. पण शिवसेनेच्या आमदार, खासदारांची गळचेपी सुरू होती. अजूनही आम्ही सांगतो की, मोदी आणि उद्धव ठाकरेंचे जवळचे संबंध आहेत. मोदी त्यांना धाकट्या भावाप्रमाणे मानतात. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी मोदींना विनंती केली तरी मार्ग निघू शकतो. त्यामुळे आत्ता ठाकरेंनी आमच्या गटाला मोठ्या मनाने आशीर्वाद द्यावेत. हा एक सन्मानजनक मार्ग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.