Eknath Shinde : ''बाळासाहेब म्हणायचे, मला घरात बसून राहणारा कार्यकर्ता नको'' शंभूराज देसाई थेटच बोलले

Shambhuraj Desai statement Shiv Sena arrow symbol Shiv Sena  Balasaheb Thackeray satara
Shambhuraj Desai statement Shiv Sena arrow symbol Shiv Sena Balasaheb Thackeray sataraesakal
Updated on

मुंबईः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं ट्वीट करुन कौतुक केलं. त्यानंतर राज्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्याला उत्तर देतांना मंत्री शंभुराज देसाई यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टोमणा मारला आहे.

शंभूराज देसाई बोलतांना म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं कष्टाळू आणि विनम्र म्हणत कौतुक केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली. आम्ही त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ऋण व्यक्त करतो आणि एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो.

Shambhuraj Desai statement Shiv Sena arrow symbol Shiv Sena  Balasaheb Thackeray satara
Uddhav Thackeray : 'भावी मुख्यमंत्री'चं सोडा! मुंबईत उद्धव ठाकरेंचे 'भावी पंतप्रधान'चे बॅनर

देसाई पुढे म्हणाले की, एकनाथ शिंदे हे बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा आचरणात आणत आहेत. डोंगर चढून जाणारा मुख्यमत्री महाराष्ट्राने बघितला नव्हता. शिवाय अनाथ मुलांचं पालकत्व मुख्यमंत्री शिंदेंनी घेतलं आहे. स्व. बाळासाहेब म्हणायचे की, मला घरात बसून राहणार कार्यकर्ता नको तर रस्त्यावर उतरून काम करणारा कार्यकर्ता हवा आहे.

Shambhuraj Desai statement Shiv Sena arrow symbol Shiv Sena  Balasaheb Thackeray satara
Nitin Gadkari: 'किलोभर मटण घरोघरी पोहोचवले, तरीही निवडणूक हरलो...', गडकरींनी सांगितला तो किस्सा

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्वाव मीच दिला होता, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. त्यावर बोलतांना शंभूराज देसाई म्हणाले की, देवेंद्र फडणीसांनी शिंदे साहेबांचं नाव सुचवलं, यातून आपुलकी दिसून येते. त्यामुळे मी फडणवीसांचे आभार मानतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.