इंडिया स्कील काँपिटिशन ; राज्यस्तरीय फेऱ्या 'या' दिवसापासून

skill competition
skill competitionsakal media
Updated on

मुंबई : शांघाय (shanghai) मध्ये 2022 ला होणाऱ्या वर्ल्ड स्कील काँपिटिशन (world skill competition) म्हणजे ऑलिंपिक ऑफ स्किल्ससाठी इंडिया स्कील काँपिटिशनच्या (india skill competition) राज्यस्तरीय फेऱ्या राज्यात तीन ते पाच सप्टेंबर दरम्यान होणार आहेत. त्यासाठी राज्यातून साडेतीनशे उमेदवारांची (candidates) निवड झाली आहे. राज्य विजेते राष्ट्रीय स्पर्धेत खेळतील व त्यातील विजेते वर्ल्ड स्कील काँपिटिशनमध्ये देशाचे प्रतिनिधित्व (represents India) करतील.

skill competition
मुंबई : कोरोनाचे फक्त 395 गंभीर रुग्ण

राज्यात 17 ऑगस्ट रोजी राज्य कौशल्य स्पर्धा सुरु झाली, त्यात 36 जिल्ह्यांमधील 3,600 युवक सहभागी झाले. या पहिल्या फेरीनंतर 23 व 24 ऑगस्ट रोजी दुसरी फेरी झाली. यातील 100 स्पर्धक सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये होणाऱ्या विभागीय स्पर्धेनंतर डिसेंबरच्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होतील.

राज्यात कौशल्यविषयक उपक्रमांची अंमलबजावणी कौशल्य विकास विभागाअंतर्गत महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीतर्फे केली जाते. त्यांच्यातर्फे कौशल्याच्या 47 प्रकारांमध्ये जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय कौशल्य स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी उच्च आर्थिक विकासाची 15 क्षेत्रे निवडण्यात आली होती. यात प्रिंट मिडिया टेक्नॉलॉजी, लँडस्केप गार्डनिंग, इंडस्ट्रीयल कंट्रोल, विमानांची देखभाल, आयटी, कृषी आदींचा समावेश होता. यासाठी बावीसहजार तरुणांनी नोंदणी केली होती.

वर्ल्ड स्कील्स ही स्पर्धा दर दोन वर्षांनी जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये घेतली जाते. ऑक्टोबर 2022 मध्ये शांघाय मध्ये होणाऱ्या या स्पर्धेत 60 पेक्षाही जास्त देश सहभागी होतील. तर इंडिया स्किल काँपिटिशन ही स्पर्धा नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनतर्फे आयोजित केली जाईल. यापूर्वी 2019 मध्ये रशियात झालेल्या वर्ल्ड स्किल इंटरनॅशनल स्पर्धेत भारताला एक सुवर्ण व रौप्य तसेच दोन कांस्य पदके मिळाली होती. यावेळी 63 देशांमध्ये भारताचा 13 वा क्रमांक आला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.