Shankarrao Chavan Birth anniversary: म्हणून शंकररावांना नरसिंहराव यांनी देशाचा गृहमंत्री केले, वाचा मैत्रीचा किस्सा

...म्हणून पी.व्ही. नरसिंहरावांनी शंकररावांना गृहमंत्री केले!
Shankarrao Chavan Birth anniversary
Shankarrao Chavan Birth anniversaryesakal
Updated on

राज्याचा विकास झालेला पहायचा असेल तर आधी शेतकऱ्यांचा विकास झाला पाहिजे. त्यासाठी त्यांची शेती फुलली पाहिजे. शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न केवळ सोडवण्यासाठी केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहून चालणार नाही, त्यासाठी ठोस योजना राबवली पाहिजे, अशी भूमिका घेणारे धडाडीचे नेते म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे तिसरे मुख्यमंत्री डॉ.शंकरराव भाऊराव चव्हाण होय. आज त्यांची जयंती.

डॉ.शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्राचे चौथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. शंकररावांचे प्राथमिक शिक्षण पैठण येथेच झाले. पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले. १९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली.

त्यानंतर शंकरराव हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते. १९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले.

Shankarrao Chavan Birth anniversary
Health News : कॅन्सरच्या पेशी काढल्या, जबडा पुन्हा तयार केला; कॅन्सर रुग्णावर ४ तासात यशस्वी शस्त्रक्रिया

कुटुंबात कोणताही राजकीय वारसा नसताना शंकररावांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांच्या राजकीय कार्यकर्तृत्वाची कमान सदैव चढती राहिली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या शाश्वत संस्कारांच्या मुशीतून शंकररावजींचे व्यक्तिमत्त्व घडले होते.

१९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते.

Shankarrao Chavan Birth anniversary
Shivsena : 'शिवसेना भवन दादर' नव्हे 'आनंद आश्रम ठाणे'; मुख्यालयाचा नवा पत्ता!

पाटबंधारे मंत्री म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली. कृष्णा-गोदावरी पाणी तंटयात त्यांची भूमिका वाखाणण्यासारखी आहे. गोदावरी, पूर्णा आणि मांजरा या धरणांमुळे मराठवाडयाचा विकास झाला. जायकवाडी धरण हे शंकररावजीं यांच्याच प्रयत्नांचे मोठे फळ आहे.

Shankarrao Chavan Birth anniversary
Political News : ..तोवर कुणाच्या बापाची हिंमत होणार नाही; NCP च्या बड्या नेत्याचं BJP खासदाराला ओपन चॅलेंज

शंकररावांनी राजकारण, समाजकारणात अफाट माणसं जोडली. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या तीन पंतप्रधानांच्या समवेत शंकररावजींना केंद्रात शिक्षणमंत्री, नियोजनमंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री, गृहमंत्री इत्यादी खात्यांचे विश्वासू मंत्री व निकटवर्ती सहकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव हे शंकररावांचे जिवलग मित्र होते.

एकदा एका सार्वजनिक समारंभात नरसिंहराव म्हणाले होते की, 'आजही काही गोष्टी परखडपणे सांगायच्या असतील तर मी शंकररावांना पुढे करीन. शब्द किती निखळ असतात हे त्यांच्याकडे पाहून जाणवते. मनातल्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत. पण भावना शब्दात मांडाव्या लागतातच. कारण भावना या अनुभवायच्या असतात. आज माझ्या मनाची स्थिती तशीच झाली आहे.

Shankarrao Chavan Birth anniversary
Ashok Chavan यांचा नाव न घेता Devendra Fadnavis वर गंभीर आरोप?

आज माझे मन आठवणीत गुंतले आहे. शंकररावांबरोबरच्या त्या आठवणी मला अनेक वर्षे मागे नेतात. अगदी स्वामी रामानंद तीर्थांच्या संग्रामात मला त्या नेऊन पोहोचवतात. आम्ही दोघे त्यांचे सचिव होतो. मी कुसुमताईंशी स्पर्धा करणार नाही. पण त्यांच्यानंतर माझाच नंबर लागेल. मी पंतप्रधान झालो, तेव्हा राष्ट्रवाद नसानसात भिनलेल्या गृहमंत्र्याची मला गरज होती. म्हणूनच शंकररावांना गृहमंत्री केले.

ना. मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना त्यांनी शंकरराव चव्हाण यांच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानभवनात त्यांचा हृद्यसत्कार घडवून आणला. त्यावेळी मनोहर जोशी आपल्या भाषणात म्हणाले होते, ना. शंकरराव चव्हाण यांनी राजकारणाचा उपयोग संपत्ती गोळा करण्यासाठी केला नाही. कोणत्याही अमिषाला ते कधी बळी पडले नाहीत. भ्रष्टाचारापासून दूर राहण्याचे कठीण व्रत चव्हाणांनी पाळले. शंकरराव चव्हाण हे चकाकणारे राष्ट्रीय नेते ठरतात, यात शंकाच नाही.

Shankarrao Chavan Birth anniversary
Shrijaya Chavhan: लेकीच्या राजकीय एन्ट्रीनंतर अशोक चव्हाणांचे सूचक ट्विट; म्हणाले...

दीर्घकाळ मित्र आणि मराठवाडा मुक्तिसंग्रामातील सहकारी राहिलेल्या व पुढे पंतप्रधान झालेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्या वरील उद्गारावरून आपणास ना. शंकरराव चव्हाण यांच्या सत्यनिष्ठा, स्पष्टवक्तेपणा आणि राष्ट्रवादी वृत्तीचे प्रत्यंतर येते. अशा या देशप्रेमाने भरलेल्या निस्वार्थी नेत्याचे २६ फेब्रूवारी २००४ मध्ये निधन झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.