Sharad Pawar vs Ajit Pawar : उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाने बैठक बोलावली आहे. दोन्ही गटाने बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. शरद पवार गटाचे प्रतोद जितेंद्र आव्हाड यांनी व्हीप जारी केला तर अजित पवार यांच्याकडून अनिल पाटील यांनी व्हीप जारी केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. कुणाच्या बैठकीत जावे, असा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या पाठोपाठ विधान परिषदेचे आमदार यांच्यासाठी शशिकांत शिंदे यांनी देखील व्हीप जारी केला.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या उद्या बैठका आहेत. शरद पवार यांच्या गटाची यशवंतराव चव्हाण सेंटरला बैठक होणार आहे तर अजित पवार यांच्याकडून एमएडीला बैठक बोलावली आहे. उद्या दोन्ही गटाच्या बैठका महत्त्वाच्या मानल्या जात आहेत. कायदेशीर कारवाई करण्यासाठी देखील उद्याचा दिवस महत्त्वाचा मानल्या जात आहे.
विधान परिषदेचे एकूण आमदारांपैकी अजित पवारांसोबत पाच आमदार तर शरद पवारांसोबत चार आमदार आहेत. रामराजे निंबाळकर, अमोल मिटकरी, विक्रम काळे,सतीश चव्हाण हे अजित पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहेत
तर एकनाथ खडसे, शशिकांत शिंदे, अरुण लाड, बाबा जानी दुरानी हे शरद पवारांसोबत असलेले विधान परिषदेचे आमदार आहे.
सुप्रिया सुळे यांचे आवाहन
महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेने आदरणीय शरद पवार साहेबांवर नेहमीच जीवापाड प्रेम केलं आहे. साहेबांचा देखील इथल्या जनतेवर जीव आहे. हे नातं अतूट आणि पहाडासारखं भक्कम आहे.
प्राप्त परिस्थितीत आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुढील दिशा देण्यासाठी ८३ वर्षांचा तरुण योद्धा म्हणजेच आपले सर्वांचे पवार साहेब उद्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीला आपण सर्वांनी प्रचंड संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. अवश्य या, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.