Sharad Pawar: आज शरद पवार-देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर येणार, राजकीय वर्तुळात चर्चा

सोलापुरात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच स्टेजवर
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

राज्याच्या राजकारणात घडामोंडींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर एकत्रित दिसणार आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच मंचावर भाषण करणार आहेत. यावेळी हे दोन्ही नेते काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

सांगोल्याचे आमदार आणि काय झाडी, काय डोंगर या आपल्या बोलण्याने चर्चेत आलेले शहाजीबापू पाटील यांच्या मतदारसंघात दोन नेते आमनेसामने येणार आहेत. त्यामुळे राज्याचे लक्ष या कार्यक्रमाकडे लागलं आहे.

Sharad Pawar
Weather Update: राज्यात पुन्हा मुसळधार कधी? वाचा हवामान विभागाचा अंदाज

दरम्यान १ ऑगस्ट रोजी पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रम सोहळ्यावेळी हे दोघेही एकाच मंचावर होते मात्र यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी नेते उपस्थित होते. यावेळी राज्यातील वातावरण तापलं होतं. तर आता सांगोल्यामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमात हे दोन नेते आमने सामने येणार असल्याने राज्यातील घडामोंडीवर आरोप-प्रत्यारोप पुन्हा समोर दिसणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे .

Sharad Pawar
Chandani Chowk Inauguration: चांदणी चौकाच्या नावाचा इतिहास एक फडणवीसांचा, एक अजित पवारांचा; वाचा दोन्ही कथा

शेकापचे दिवंगत नेते भाई गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचे अनावरण होणार असून या कार्यक्रमासाठी शरद पवार सोलापूर येथून अडीच वाजता पोचणार आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुपारी सव्वा दोन वाजता सांगोल्यात येणार आहेत.

दरम्यान अजित पवार यांनी शिवसेना-भाजपला पाठिंबा दिल्यानंतर शरद पवार यांनी भाजपाला विरोध दर्शवत आपली भूमिका मांडली. त्यानंतर INDIA च्या बैठकीत सहभाग घेतला होता. यातच शनिवारी पुण्यात पुन्हा शरद पवार आणि अजितदादा यांची भेट झाल्यानंतर आजच्या कार्यक्रमात कोण काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Sharad Pawar
Nitin Gadkari: 'हजार कोटींचा पूल बांधून देतो पण..', अडचणीत सापडलेल्या गडकरींच्या मदतीला धावले फडणवीस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.