Latest Nagpur News: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचे पुत्र सलिल देशमुख यांनी काटोल-नरखेड या एकाच विधानसभा मतदार संघावर दावा ठोकला होता. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची अडचण झाली होती.
आता सलिल यांनी आपला मोर्चा मोर्शी विधानसभा मतदारसंघाकडे वळवल्याने यातून तोडगा निघण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.