Sharad Pawar Video : मराठा आरक्षणावर तुमची भूमिका काय? गाडी अडवणाऱ्या आंदोलकांना पवारांचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...

Sharad Pawar Car Stopped by Maratha Protesters Video : सोलापुरात मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली आणि मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.
maratha-protesters-stop-sharad-pawars-car-in-solapur
maratha-protesters-stop-sharad-pawars-car-in-solapur
Updated on

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्षांते नेते सध्या राज्याभरता राजकीय दौरे काढताना दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याच्या घटना देखील पाहायला मिळत आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलकांनी शरद पवारांची गाडी रोखून एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील केली. हा प्रकार शरद पवार बार्शी दौऱ्यावर असताना टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर घडला.

शरद पवार हे आज सोलापूरातील बार्शी दौऱ्यावर आहेत. टेंभुर्णी कुर्डूवाडी रस्त्यावर आंदोलकांनी त्यांची गाडी अडवली आहे. यावेळी मराठा आंदोलकांनी पवरांना मराठा आरक्षणाबाबत तुमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली.

maratha-protesters-stop-sharad-pawars-car-in-solapur
Jalna - Jalgaon Railway : रेल्वेचा सर्वात मोठा बोगदा होणार महाराष्ट्रात! जालना, औरंगाबाद अन् जळगाव हे जिल्हेही जोडले जाणार

शरद पवार काय म्हणाले?

मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची आंदोलकांची मागणी केल्यानंतर. शरद पवारांनी गाडी थांबवून कारचा दरवाजा उघडला. त्यानंतर आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत  'माझा आरक्षणाला पाठींबा आहे', असेही शरद पवार म्हणाले. त्यानंतर आंदोलकांनी तुम्ही पाठिंबा आहे असं म्हणता पण भूमिका स्पष्ट करत नाही असेही पवारांना सुनावले. त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी सोडली. यावेळी मराठा आंदोलकांनी घोषणा देखील दिल्या.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांच्याकडून देखील राज्याचा दौरा केला जात आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची देखील तयारी सुरू आहे.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या, अशी मागणी मनोज जरांगे पाटील करत आहेत. त्यांच्या या मागणीसाठी तसेच राज्यात बिघडलेली सामाजिक परिस्थिती पाहाता त्यांनी महाराष्ट्रात शांतता रॅली देखील काढली आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केला नाहीत, तर विधानसभेला तुमचे सर्व आमदार पाडणार, असा इशाराही मनोज जरांगे यांनी महायुती सरकारला दिला आहे. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे.

maratha-protesters-stop-sharad-pawars-car-in-solapur
Anantnag encounter : जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचे 2 जवान शहीद, 3 जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.