NCP Sharad Pawar : "येउद्या कितीही कष्ट, पाठीशी आहे महाराष्ट्र" शरद पवारांच्या स्वाभिमान सभेचा Teaser Release

Sharad Pawar Video Viral
Sharad Pawar Video ViralSakal
Updated on

बीड : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार गटाने महाराष्ट्र दौरा सुरू केला आहे. या दौऱ्यातीलच उद्या (१७ ऑगस्ट) बीड येथे स्वाभिमान सभा होणार असून त्याआधी राष्ट्रवादीकडून एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्या सभेचा हा टीझर असून या सभेसाठी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुप्रिया सुळे हे नेते उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीने शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बाप तो बापच, स्वाभिमान सभा, येऊदेत कितीही कष्ट, पाठीशी उभा अख्खा महाराष्ट्र, मी साहेबांसोबत, लढा विचारांचा महाराष्ट्राच्या हिताचा असे नारे देण्यात आले आहेत.

"देशावर आलेल्या प्रत्येक संकटाचा धैर्याने सामना करण्यासाठी पुढे सरसावणे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. पुरे झाला शेतकरी, कष्टकरी, महिला व युवकांवरील अन्याय, प्रत्येक दुर्लक्षीत घटकाला मिळवून द्यायचाय न्याय!

विचारांच्या लढ्याने महाराष्ट्राचे हित साधण्यासाठी आणि राष्ट्रीय अध्यक्ष आ. खा. पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्ताला निडर ताकद दाखवून देण्यासाठी गुरूवार दिनांक १७ ऑगस्ट २०२३ रोजी दु. १ वाजता पारस नगरी, माने कॉम्प्लेक्सजवळ, बीड येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहूयात!" असं कॅप्शन टाकून हा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.

Sharad Pawar Video Viral
Onion Import : नेपाळमधून महाराष्ट्रात कांदा आयात होणार नाही, नाफेडमार्फत विक्रीही नाही- भारती पवार

शरद पवारांचा रविवारी पुण्यात कार्यकर्ता मेळावा

पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गटाची जोरदार पक्षबांधणी सुरू असून रविवारी पुण्यात कार्यकर्ता मेळावा घेण्यात येणार आहे. नाशिक, बीडनंतर ते आता पुण्यातील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सोशल मीडिया फंडच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

यावेळी दिवसभर सोशल मीडियाचे शिबीर पार पडेल आणि सायंकाळी शरद पवार मार्गदर्शन करतील. यावेळी सुप्रिया सुळे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाडसुद्धा उपस्थित असतील अशी माहिती आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.