माझ्यापेक्षा शरद पवार अन् भाजपची दोस्ती चांगली- महादेव जानकर

Sharad Pawar bjp friendship Mahadev Jankars statement
Sharad Pawar bjp friendship Mahadev Jankars statement esakal
Updated on

गत लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना घाम फोडणाऱ्या भाजपने २०२४ च्या निवडणूकीसाठी बारामती मतदार संघावर आत्तापासूनच लक्ष केंद्रीत केले आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या १६ ऑगस्टपासून तीन दिवसीय बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, रासपचे अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी केलेले विधान सध्या चर्चेत आले आहे.(Sharad Pawar bjp friendship Mahadev Jankars statement)

दोन दिवसांपूर्वी जानकर दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माझ्यापेक्षा पवार साहेबांची आणि भाजपची दोस्ती चांगली आहे. असे वक्तव्य केलं. आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.

Sharad Pawar bjp friendship Mahadev Jankars statement
TET घोटाळ्यात सत्तारांचा समावेश?; प्रवीण दरेकर म्हणाले "हा शिक्षण क्षेत्राला कलंक"

नेमंक काय म्हणाले जानकर? ओबीसींसंदर्भात चर्चा

दिल्ली दौऱ्यादरम्यान जानकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर मंत्रीमंडळाच्या विस्ताराच्या चर्चेला उधाण आलं मात्र, त्यांनी मंत्रिमंडळावर कुठलीही चर्चा केली नसल्याचं स्पष्ट केले. तसेच यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाणार का? असा प्रश्न जानकर यांना विचारण्यात आला होता.

त्यावर, राजकारणात जर-तरला किंमत नाही. मी सध्या एनडीएसोबत आहे, त्यामुळं या बोलण्याला अर्थ नाही. दिल्लीत शरद पवारांची भेट होती. देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट होती, रामदास आठवलेंच्या घरी जेवायलो जातो, असे म्हणत आपले संबंध सर्वपक्षीय चांगले असल्याचं त्यांनी दाखवून दिले.

Sharad Pawar bjp friendship Mahadev Jankars statement
आदित्य ठाकरेंची प्रकृती बिघडली; शिव संवाद यात्रेचा चौथा टप्पा रद्द

त्यानंतर त्यांना पवारांच्या जवळ आहात का? या प्रश्न केला असता, असे काही नाही, माझ्यापेक्षा पवार साहेबांची आणि भाजपची दोस्ती चांगली आहे, असे जानकर म्हणाले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, महादेव जानकर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. भाजपने मित्रपक्षांचा सन्मान ठेवावा. पुढील दोन तीन दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, यात रासपला मंत्रिपद मिळावे अशी मागणी महादेव जानकर यांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.