अधिवेशनापूर्वी शरद पवारांची तत्काळ बैठक, राष्ट्रवादीचे मंत्री उपस्थित

NCP Meeting
NCP Meetingटिम ई सकाळ
Updated on

येत्या ३ मार्चपासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतंय. या पार्श्वभूमीवरून मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरवर शरद पवार यांनी तातडीने बैठक बोलावली आहे. यासाठी राज्यातील महत्वाचे नेते आणि राष्ट्रवादीचे मंत्री दाखल झाले आहेत. नवाब मलिकांच्या राजीनामा घेणार का याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे. (Maharashtra Assembly Session 2022)

यासोबतच अधिवेशनातील कामकाजाबाबत या बैठकीत चर्चा करणार असल्याचं समोर येतंय. या बैठकीला अजित पवार, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, रामराजे निंबाळकर आणि अदिती तटकरे दाखल झाले आहेत. (Sharad Pawar calls NCP ministers meet in YB Center Hall)

NCP Meeting
युक्रेनमध्ये मुलगा गमावलेले वडील म्हणाले, '९७ टक्के गुण असूनही इथे…'

विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणूकीसंदर्भात प्रश्नचिन्ह कायम आहे. ९ मार्च रोजी विधानसभा अध्यक्ष निवडणूक घ्यावी याबाबत राज्य सरकारने २३ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवले. पण राज्यपालांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे भगतसिंह कोश्यारींना स्मरण पत्र देण्याबाबत सरकार मध्ये विचार सुरू आहे.

NCP Meeting
तेरा वर्षांच्या मुलाला चार महिने ठेवलं डांबून; साधूला 7 वर्षांची शिक्षा

या बैठकीआधी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपवर टीका केली आहे. ते म्हणाले, “खोटे नाटे आरोप करायचे, गोंधळ करायचा आणि विधानसभा अधिवेशनाच्या आधीच ते जाहीर करायचे, ही भाजपची कार्यपद्धती आहे. विरोधकांना ही चहापाण्याच्या कार्यक्रमाला नेहमी प्रमाणे आमंत्रण दिले जाईल, पण ते नेहमी प्रमाणे चहापाण्याला येणार नाहीत. चहापाण्याला येण्याचे त्यांनी विरोधकांना आवाहन केले आहे. सोबत चर्चे अंती सर्व प्रश्न सुटत असतात, असं पाटील म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.