Sharad Pawar Latest News : ''केंद्र सरकारने कांद्याबाबत घेतलेला निर्णय...'' शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Sharad Pawar
Sharad Pawar esakal
Updated on

Onion Market News : महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर तोडगा काढला जावा यासाठी आज राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. या भेटीनंतर केंद्र सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून सरकार २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करणार आहे. तसेच या खरेदीसाठी नाशिक आणि नगरमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत.

केंद्र सरकारच्याया निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. पवार म्हणाले की, केंद्र सरकारचा निर्णय आपेक्षा पूर्ण करणारा नाही. केंद्र सरकारने प्रतिक्विंटलसाठी दिलेला २४१० हा भाव कमी आहे. कांद्याला चार हजार रुपये भाव द्यावा, ही मागणी आहे. २ हजार ४०० रुपयांमध्ये शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणार नाही.

Sharad Pawar
क्रूरतेचा कळस! आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या 15 वर्षीय मुलीवर घरात घुसून सामूहिक बलात्कार

शरद पवार पुढे म्हणाले की, सध्याचा कांदा टिकणारा कांदा आहे. त्यामुळे शेतकरी थांबायला तयार आहेत. म्हणूनच निर्यात शुल्क कमी करण्याची मागणी होत आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, अशी मागणी पवारांनी यावेळी केली.

Sharad Pawar
Asia Cup 2023 : अरे हा तर मुंबई इंडियन्सचा संघ, आशिया कपमध्ये कॅप्टन रोहितनं डाव साधला?

पियुष गोयल काय म्हणाले?

दरम्यान, धनंजय मुंडे यांच्या भेटीनंतर पियुष गोयल यांनी देखील कांदा खरेदीबद्दल माहिती दिली. गोयल म्हणाले की, पुढे देखील आणखी कांदा खरेदी करावा लागला तर खरेदी करू. मध्यप्रदेश, गुजरात येथे कांदा होतो तेथे देखील एनसीसीपएफ आणि नाफेड कांदा खरेदी करेल. यामुळे शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल. या कांदा खरेदीचा दर आज निश्चित झालेला भाव २४१० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामुळे शेतकऱ्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकार यावर नियंत्रण ठेवून आहे आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी सरकार पुर्णतः तत्पर आहे असे पियुष गोयल म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.