Sharad Pawar : पवारांच्या बोलण्याचा अर्थ समजणारा जन्मायचा; शपथविधीच्या मुद्दावर BJPनेत्याचं विधान

Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

पुणे - पहाटेचा शपथविधी झाला नसता तर राष्ट्रपती राजवट उठली नसती, अशा आशयाचं विधान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. याच विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलणं टाळलं. (Sharad Pawar news in Marathi)

Sharad Pawar
Sharad Pawar : आता एवढं बोलले तर राष्ट्रपती राजवट का लागली तेही सांगा? - देवेंद्र फडणवीस

पाटील म्हणाले की, शरद पवार काय बोललेत आणि त्याचा अर्थ काय हे? समजणारा माणूस अजून महाराष्ट्रात जन्मायचाय...ते बोलतात एक आणि त्याचा अर्थ दुसरा निघतो, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं घाईच होईल, असं म्हणतं पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया देणं टाळलं. मात्र आमचं ते चांगलं आणि दुसऱ्याचं ते वाईट अशी ग्रामीण भागात एक म्हण आहे. त्यामुळे शरद पवार यांनी असं म्हणणं संयुक्तिक वाटत नाही, असंही म्हणाले.

Sharad Pawar
Sanjay Raut | आमचे राजकारण संयम आणि समन्वयाचे : खासदार राऊत यांचा घणाघात

कसबा पोटनिवडणुकीत हेमंत रासने 50 हजारांच्या मार्जिनने निवडून येतील. आतापर्यंत कसब्यात आमचा उमेदवार ४३ हजार मताधिक्याने निवडून आले होते. आता त्यापेक्षाही जास्त मार्जिन आम्हाला मिळेल.

शिवसेनेच्या सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर पाटील म्हणाले, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर बोलणं योग्य वाटत नाही. तर एमपीएससीच्या विद्यार्थी आंदोलनावर त्यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्या पाहिजे असं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.