फडणवीसांविषयी तेवढी एकच गोष्ट मला अजितने सांगितली होती- पवार

Sharad Pawar clarifies his role about ajit pawr Takes oath with Devendra Fadanvis
Sharad Pawar clarifies his role about ajit pawr Takes oath with Devendra Fadanvis
Updated on

मुंबई : २३ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली यावर स्पष्टीकरण देताना शरद पवार यांनी आपल्याला याविषयी कल्पना नसल्याचे एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे. या राजकीय भूकंपाबाबत पवार म्हणाले, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार देवेंद्र फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

शरद पवार यांनी स्वतःची बाजू स्पष्ट करताना सांगितले की, लोकांना असे वाटते की, मला याची पूर्ण कल्पना असेल, किंवा अजित पवारांच्या या अशा कृतीला माझा पाठिंबा असेल. परंतु हे साफ चुकीचं आहे. मला त्याबद्दल काहीही माहित नव्हते. सुरुवातीच्या वेळी मला अजित पवारांनी एकच गोष्ट सांगितली होती. अजित पवार एके दिवशी मला म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलायचं म्हणतात. मी जाऊ का?" राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, या भूमिकेतून मी अजित पवारांना फडणवीसांशी बोलण्यासाठी होकार दिला. 

बहुचर्चित रामटेक बंगला पुन्हा भुजबळांकडे; पाहा कोण कोठे राहणार

अजित पवार यांची फडणवीस यांच्याशी बोलणी सुरु आहे. पण, ती अशा कुठल्यातरी विषयावर असेल याची तर कल्पना नव्हतीच शिवाय, दुसऱ्या दिवशी असं काही घडेल, याची मला कल्पना नव्हती असेही पवार यांनी सांगितले आहे. दुसऱ्या दिवशी शपथविधी पाहून मलाही आश्चर्य वाटलं. परंतु, मला त्यादिवशी समजलं की, आपले पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल हे सगळे किती जोमाने काम करतात. सकाळी सहा वाजता हे सगळं घडतंय, हे पाहून माझा विश्वासच बसत नव्हता, असेही पवार यांनी सांगितले.

पंकजा यांच्या पक्षांतराच्या चर्चांवर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण 

शपथविधीला जे लोक उपस्थित होते त्यातले काही चेहरे पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की हे लोक असे आहेत जे मी म्हणेन तेच करतील. हे माझे लोक आहेत. त्यामुळे हे जे काही घडलंय आणि घडतंय ते मी सुधारु शकतो, याचा मला विश्वास होता, आणि पुढे काय घडलं हे आपण सर्वांनी पाहिलं असल्याचेही पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.