Raj Thackrey : '...म्हणूनच मी राजकारणावर सतत बोलणं टाळतो'; राज ठाकरेंनी सांगितलं 'हे' कारण

शरद पवार माझ्यावर टीका करतात पण मी त्यावर काही बोलत नाही
Raj Thackrey
Raj ThackreyEsakal
Updated on

महाराष्ट्राचं राजकारण दिशाहिन झाल्याचं चित्र आहे. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया या पलिकडे काही दिसत नाही. यावरून सातत्याने माध्यमाच्या कार्यपद्धतीवर टीका होते. मात्र आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राजकारणातील विविध मुद्यांवर भाष्य केलं आहे.

दरम्यान रोज कोणते ना कोणते राजकीय नेते, कार्यकर्ते, मंत्री, आमदार, खासदार किंवा इतर पदाधिकारी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतात. तर काही कोणत्याही गोष्टींवर टीका करत असतात. यावर राज ठाकरे यांनी टीका करत मी का या टीकांवर उत्तर देत नाही याचं कारण त्यांनी सांगितलं आहे.

हे ही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

राज ठाकरे बोलताना म्हणाले की, राज्यातील सध्याची राजकीय परीस्थिती लयाला गेली आहे. महाराष्ट्रातील राजकारणाची एकूण परिस्थिती विषण्ण करणारी आहे. त्यामुळे मी महिने-दोन महिने राजकारणावर काहीच बोलत नाही असं राज ठाकरे म्हणाले आहेत.

Raj Thackrey
Raj Thackeray : राजकारणाच्या घसरलेल्या पातळीवर राज ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले...

तर नारायण राणे किंवा संजय राऊत एकमेकांवर काय टीका करतात, याच्याशी लोकांना देणघेणं काय आहे. त्यामुळे मी राजकीय परिस्थितीवर बोलणं टाळतो. परिणामी मी अनेक दिवस राजकारणाबाबत बोलतच नाही. पण मग शरद पवार बोलतात, राज ठाकरे मध्येच येतात आणि बोलतात, असा खोचक टोला राज ठाकरे यांनी शरद पवार यांना लगावला आहे. पुण्यातील 18 व्या जागतिक मराठी संमेलनात आज राज ठाकरे यांची मुलाखत घेतली यावेळी राज ठाकरे यांनी या मु्द्द्यांवर भाष्य केलं आहे.

Raj Thackrey
Urfi Javed Controversy : सुप्रिया ताईंनाही राहावेना उर्फी जावेदच्या कपड्यांबद्दल म्हणाल्या....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.