राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Sharad Pawar death threat to Maharashtra Politics)
शरद पवार यांना ट्विटरद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ पोलीस आयुक्तांच्या भेटीला दाखल झाल आहे. (Latest Marathi News)
'भाडखाउ तुझा दाभोळकर केला जाईल. अशा स्वरूपाची धमकी ट्विटर द्वारे देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर या ट्विटरवर हँडलवरुन ही धमकी देण्यात आली आहे.(Latest Marathi News)
गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे
मला व्हॉट्सअपवर हा मेसेज आला आहे. त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यामध्येही आक्षेपार्ह मेसेज आहेत. ज्या पद्धतीने धमकी देण्यात आली आहे हे अत्यंत दुर्दैवी आहे. गृहमंत्र्यांनी तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. (Latest Marathi News)
धमकी देणे हे आमच्या रक्तात नाही. जो कुणी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्या धमकी प्रकरणावर दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगजेबाचे स्टेटस ठेवून त्याचे उदात्तीकरण केल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागले होते. संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये अशी घटना घडलेल्याने राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. (Latest Marathi News)
या सर्व घडामोडीदरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यासंदर्भात वादग्रस्त ट्विट केले आहे.
निलेश राणें पवारांसदर्भात वादग्रस्त ट्विट?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.