Sharad Pawar : राष्ट्रवादीने उद्याच्या सुनावणीसाठी केली खास तयारी; त्याआधी दिल्लीत प्रफुल्ल पटेलांच्या विरोधात घोषणाबाजी

NCP made special preparations for tomorrow's hearing
Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar VS Sharad PawarEsakal
Updated on

नवी दिल्लीः राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा? याचा तिढा सोडवण्यासाठी उद्या (शुक्रवारी) केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी संपन्न होणार आहे. त्यादृष्टीने आज (गुरुवारी) दिल्लीत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या विस्तारित कार्यसमितीची बैठक संपन्न होतेय.

राष्ट्रवादी काँग्रेसममध्ये उभी फूट पडल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. उद्या पहिली तारीख असल्याने गुरुवारी दिल्लीमध्ये विस्तारित कार्यसमितीची बैठक बोलावण्यात आलेली आहे. या बैठकीसाठी २४ राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांची उपस्थिती आहे. आयोगाकडील सुनावणीमध्ये काही विपरित निर्णय झालाच तर पुढची रणनीती काय असेल? यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Nanded Hospital Deaths: नांदेडच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल केंद्राला सादर; भारती पवारांनी दिली महत्वाची अपडेट

निवडणूक आयोगामध्ये शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी हे बाजू मांडणार आहेत. बैठकीमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करणारा प्रस्ताव पीसी चाको यांनी मांडला. त्याला खासदार वंदना चव्हाण यांनी अनुमोदन दिले. हा प्रस्ताव मान्य आहे का, असे पवारांनी विचारल्यानंतर सर्वांनी हात उंचावून पाठिंबा दिला आणि प्रस्ताव मंजूर केला.

Ajit Pawar VS Sharad Pawar
Ajit Pawar : भाजपला शिंदे-अजित दादासारखे मिळाल्याने आमची गरज संपली; जानकरांचं विधान

दरम्यान, यावेळी प्रफुल्ल पटेल मुर्दाबाद, अशा घोषणा अंदमानच्या प्रवक्त्या उमा भारती यांनी दिल्या. बैठकीमध्ये सर्व प्रदेशाध्यक्षांकडून प्रतिज्ञापत्र भरुन घेण्यात येत आहेत. सर्व प्रतिज्ञापत्र केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्याची शक्यता आहे. पक्षाचं संघटन शरद पवार गटाच्या बाजूने आहे, हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()