Sharad Pawar : 'त्या' फोटोनंतर शरद पवारांची प्रफुल्ल पटेलांबद्दल गुजरातमध्ये नाराजी; म्हणाले...

sharad pawar on praful patel
sharad pawar on praful patelesakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शनिवारी गुजरातच्या अहमदाबादमध्ये होते. गौतम अदानी यांच्या एका कार्यक्रमासाठी त्यांनी हजेरीदेखील लावली. त्यानंतर त्यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून प्रफुल्ल पटेल यांच्याबाबत भाष्य केलं.

शरद पवार हे शनिवारी गौतम अदानी यांच्या एका कंपनीच्या उद्घाटनासाठी गेले होते. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे. त्यानंतर त्यांनी अदानींच्या निवासस्थानी मुक्काम केला. पवारांच्या अदानी भेटीमुळे पुन्हा राजकीय चर्चा सुरु झालेल्या होत्या.

sharad pawar on praful patel
ZP Recruitment News : जि. प. नोकरभरतीसाठी 3 ऑक्टोबरपासून परीक्षा; जाणून घ्या संभाव्य वेळापत्रक

दरम्यान, संसदेच्या विशेष अधिवेशनादरम्यानच शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या एकत्रित फोटोची खूपच चर्चा झाली. राज्यामध्ये एकमेकांच्या विरोधात बोलायचं आणि दिल्लीमध्ये एकत्रित फोटो काढायचा, यामुळे राजकीय वर्तुळात हा विषय हॉट ठरला.

या फोटोमुळे झालेल्या चर्चांना एकप्रकारे शरद पवारांनी उत्तरच दिलं आहे. शनिवारी अहमदाबादमध्ये आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याविषयी जाहीर नाराजी बोलून दाखवली.

sharad pawar on praful patel
Ajit Pawar : ...म्हणून अजित पवार अमित शाहांच्या दौऱ्याला अनुपस्थित होते; स्वतःच सांगितलं कारण

शरद पवार म्हणाले की, महत्त्वाची पदं देऊनदेखील प्रफुल्ल पटेल अजित पवार यांच्यासोबत गेले. पक्षातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी पक्ष म्हणून मजबुतीने काम सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, अजित पवार यांच्या बंडानंतर हे खरंच बंड आहे का? असा प्रश्न पडावा, अशा घटना नेहमी घडतात. दोन्ही गटांचे नेते एकमेकांसोबत हस्तांदोलन करताना, गप्पा मारताना अथवा हितगुज साधताना दिसतात. स्वतः शरद पवार आणि अजित पवार यांनी पुण्यामध्ये एक बैठकही झालेली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं चाललंय काय? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.