Anil Deshmukh : 'ज्यांनी देशमुखांवर ही वेळ आणली त्यांचा पंतप्रधानांनी…'; शरद पवारांचं मोठं विधान

Sharad pawar first reaction on anil deshmukh getting out of jail said will meet pm narendra modi
Sharad pawar first reaction on anil deshmukh getting out of jail said will meet pm narendra modi esakal
Updated on

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज तब्बल एकावर्षापेक्षा जास्ता काळ तुरूंगात काढल्यानंतर बाहेर आले. राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांकडून देशमुखांचे जंगी स्वागत करण्यात आले, दरम्यान अनिल देशमुख यांच्या सुटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सत्तेचा गैरवापर कसा होता याचं हे उत्तम उदाहरण असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले की, "हे सत्तेचा गैरवापर कसा होतो याचं उत्तम उदाहरण अनिल देशमुख, सामनाचे संपादक संजय राऊत आणि काही सहकाऱ्यांच्या अटकेमधून समोर आलx. कोर्टाचा जो काही निकाल लागला तो निकाल राज्यकर्त्यांना सदबुद्धी असेल तर विचार करायला आणि त्यांच्या धोरणात बदल करण्यासाठी उपयुक्त आहे" असे म्हटले आहे.

अनिल देशमुखांच्या अटकेबाबत शरद पवार पुढे म्हणाले की, "कोर्टाने स्पष्ट म्हटले आहे, ज्या व्यक्तीवरचा पहिला आरोप १०० कोटीचा अपहार केला, नंतर जे चार्जशीट दिलं त्यावर शंभर हा आकडा नव्हे साडेचार कोटी म्हणून खाली आणला आणि फायनल शार्जशीट दिलं त्यात एक कोटीचा अपहार झाला असं दिलं. त्यानंतर कोर्टाने स्पष्ट सांगितलं की यामध्ये काहीही गैरव्यवहार झालेला नाही" असे पवार म्हणाले.

Sharad pawar first reaction on anil deshmukh getting out of jail said will meet pm narendra modi
Rahul Gandhi On Marriage : लग्नासाठी कशी मुलगी हवीय? राहुल गांधींनी पहिल्यांदाच दिलं उत्तर

"सत्तेचा वापर चुकीच्या पध्दतीने केला आहे. कारण नसताना सुसंस्कृत आणि कर्तृत्ववान व्यक्तीला जवळपास १३ महिने तुरुंगात डांबून ठेवलं. आज समाधानाची गोष्ट ही आहे की शेवटी न्यायपालिकेने न्याय दिला. पण ही स्थिती ज्यांनी निर्माण केली त्यांचा विचार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी करावा" असे शरद पवार म्हणाले.

Sharad pawar first reaction on anil deshmukh getting out of jail said will meet pm narendra modi
Corona Outbreak : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासाठी पुढचे ४० दिवस महत्त्वाचे; जानेवारीत रुग्णसंख्येचा स्फोट?

"ज्या यंत्रणेने हे निर्णय घेतले त्या यंत्रणेसंबंधी अधिक माहिती एकत्रित करून संसदेतील सहकाऱ्यांना सोबत घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. आमच्या सहकाऱ्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या इतरांना ती स्थिती येऊ नये हा आमचा प्रयत्न आहे" असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.