Sharad Pawar : मराठा, धनगर आरक्षणाबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, 'आम्ही यात राजकारण आणू इच्छित नाही पण..'

महाराष्ट्रात भाजपचा पराभव आरएसएसने गार्भियाने घेतला आहे. परंतु, सामान्य जनता महाविकास आघाडीकडे झुकली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on
Summary

शरद पवार म्हणाले,`` महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी समजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या महत्वाचा ठरत आहे. त्यामध्ये केंद्राने बघ्याची भूमिका न घेता प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.''

माळेगाव : मराठा व धनगर आरक्षणाबाबतचा (Maratha and Dhangar Reservation) निर्माण होणारा सामजिक तणाव कमी होणे, पुणे जिल्ह्यातील जानाई-शिरसाई योजना, पुरंदर उपसा आणि या योजनांच्या वीज बिलाच्या प्रश्न आणि खर्चाच्या तुलनेत दुधाचे दर शेतकऱ्यांना मिळवा, यासाठी मी मुख्यमंत्र्यांची पत्राद्वारे वेळ मागितली आहे. याबाबत उद्या (शुक्रवारी) संबंधित आधिकाऱ्यांशी बोलणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी मी आग्रही आहे. ही लोकहिताची कामे उरकून मी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहे. विधानसभेत जेथे-जेथे आम्ही जागा लढविणार आहेत, त्याठिकाणी जावून लोकांशी व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर उमेदवारीबाबत निर्णय घेणार आहे, अशी माहिती ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बारामतीत स्पष्ट केली.

Sharad Pawar
आता 'सातबारा'वरही लागणार आईचं नाव; शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, अर्जदाराला कोणते पुरावे द्यावे लागणार? जाणून घ्या..

व्यक्तिगत हल्ले आणि अपघात वाढले आहेत. राज्य सरकारचे याबाबत दुर्लक्ष होत असल्याने जीवितहानी होत आहे. त्यावर पवार यांनी नाराजी व्यक्त केली. बारामती लोकसभा निवडणुकीनंतर (Baramati Lok Sabha Election) शरद पवार (Sharad Pawar) यांनी बारामती, इंदापूर आदी ठिकाणी मोठा दौरा पूर्ण केला. त्या पार्श्वभूमीवर आज पवार बारामतीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी युगेंद्र पवार उपस्थित होते.

दरम्यान, शरद पवार म्हणाले, ``जानाई शिरसाई व पुरंदर उपसा सिंचन योजना दुष्काळी भागाला न्याय देणाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. या योजनांच्या मान्यता त्या काळी माझ्या सहीने झाल्या आहेत. आता या योजनांची दुरूस्ती आणि विस्तारिकण करण्याची गरज आहे. वीज बिलांचा विषय आहे. या धोरणात्मक गोष्टी राज्य सरकारच्या अधिपत्याखाली येतात. त्यावर ठोस उपायोजना करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले आहे. त्यानुसार पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या उपस्थित याबाबत महत्वापूर्ण बैठक मुंबईत होईल.``

Sharad Pawar
'रवींद्र वायकरांचं जिंकणं शंकास्पद, त्यांना लोकसभेत खासदार म्हणून शपथ देऊ नका'; 'या' पक्षानं थेट लोकसभा सरचिटणीसांना धाडली नोटीस

पाण्याबरोबर दुधाचा धंदा महत्वाचा आहे, असे सांगून पवार म्हणाले, ``दुधाची किंमत (Milk Price) ही खर्चाच्या तुलनेत असावी. शासनाचे पाच लिटर दुधाला अनुदान मिळत नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्याबाबतही मुख्यमंत्र्याच्या बैठकीत तोडगा काढण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.`` इंडिया आघाडीचा विरोधी पक्षनेता कोण असणार, असे विचारले असता पवार म्हणाले,`` पार्लमेंटचे कामकाज २६, २७ जूनला सुरू होत आहे. त्यावेळी बसून विरोधी पक्ष नेता निवडीबाबत चर्चा करणार आहे. काॅंग्रेसच्या लोकसभेत सर्वाधिक जागा आल्याने त्यांना विरोधी नेतेपद मिळेल, त्यांच्या निर्णयाला आमची सहमती असेल.

लोकसभा अध्यक्षपद रुलिंग पार्टीला जाते, उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले,``मोदी साहेबांनी मागच्यावेळी हा संकेत पाळला नव्हता. त्यामुळे याबाबत चर्चा होईल, परंतु त्यामधून काही यश येईल असे मला वाटत नाही. लोकसभेच्या निवडणुकीत जनेतेने त्यांना जागेवर आणले असले, तरी मोदी हे मोदी आहेत ते कोणाचे ऐकतील असे वाटत नाही.``

Sharad Pawar
Monsoon Season : जून महिन्यात देशात सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रात काय असणार मॉन्सूनची स्थिती? IMD चा नवा अंदाज समोर

महाराष्ट्रात भाजपचा पराभव आरएसएसने गार्भियाने घेतला आहे. परंतु, सामान्य जनता महाविकास आघाडीकडे झुकली आहे. यावर पवार म्हणाले,`` भाजप आणि मोदी सरकार यांच्या विश्वासाला जनतेमध्ये तडा बसला आहे. मोदीसाहेबची गॅरंटी राहिली नाही. लोकसभेच्या ४८ जागा होत्या, त्यापैकी आमच्या तीन पक्षाने ३०, ३१ जागा जिंकल्या. विधान सभेच्या मतदार संघांचा विचार केला, तर १५५ मतदार संघामध्ये आम्हा लोकांचा विजय झाला. २८८ जागेची विधान सभा त्यातील १५५ मतदार संघात विरोधकांना बहुमत मिळते. याचा अर्थ जनतेचा कल हा महायुतीकडे आहे. त्या दुष्टीने आम्ही महाराष्ट्र जिंकण्यासाठी काळजीने पावले टाकणार आहे.`` छगन भुजबळ आपल्याकडे परतण्याचे संकेत दिसतात का, यावर पवार यांनी नकारार्थी भूमिका मांडली व माझी त्यांची अलिकडच्या काळात भेट नसल्याचे सांगितले.

केंद्राने आरक्षणाचा मुद्या निकाली काढावा...

शरद पवार म्हणाले,`` महाराष्ट्रात मराठा, धनगर आदी समजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या महत्वाचा ठरत आहे. त्यामध्ये केंद्राने बघ्याची भूमिका न घेता प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. केंद्राला कायद्यात बदल करावा लागले. दोन्ही समाजाचे एका मर्य़ादेच्या बाहेर आंदोलन न जाईल याची काळजी घेण्याची गरज आहे. त्यामध्ये समाजिक ताण निर्माण होऊ नये, याची जबाबदारी सगळ्यांची आहे. आम्ही येथे राजकारण आणू इच्छित नाही. पण येथे केंद्राला बघ्याची भूमिका घेवून चालणार नाही.``

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.