Yugendra Pawar : शरद पवारांची दूरदृष्टी! अजित पवारांच्या पुतण्यावर चार वर्षांपूर्वी दिली होती 'ही' जबाबदारी; युगेंद्र पवार म्हणाले...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन त्यांचा पक्षदेखील बळकावला आहे. आता एक नवीन खेळी शरद पवार गटाकडून केली जातेय. खुद्द अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजितदादांशी दुरावा करुन शरद पवारांशी जवळीक साधली आहे.
Yugendra Pawar
Yugendra Pawaresakal
Updated on

मुंबईः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काका शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन त्यांचा पक्षदेखील बळकावला आहे. आता एक नवीन खेळी शरद पवार गटाकडून केली जातेय. खुद्द अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी अजितदादांशी दुरावा करुन शरद पवारांशी जवळीक साधली आहे.

युगेंद्र पवार यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात जात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत मागच्या चार वर्षांपासून काम करत असल्याचं सांगितलं. शरद पवारांनी त्यांच्यावर दिलेल्या जबाबदारीबद्दलही त्यांनी खुलासा केला.

युगेंद्र पवार म्हणाले की, मी पूर्वीपासून सामाजिक कार्यात आहे. मी शिक्षणासाठी मुंबईत होतो, नंतर पुण्यात शिकलो. नंतर युरोपमध्ये आणि अमेरिकेत शिक्षण घेतलं. सात-आठ वर्षे मी बाहेरच होतो. मी परत आल्यानंतर शरयू ग्रुपचं काम बघत होतो. चार वर्षांपूर्वी साहेबांनी (शरद पवार) माझी निवड विद्या प्रतिष्ठानमध्ये केली. दर आठवड्याला आमची मीटिंग असते, मी त्यासाठी येत असतो.

Yugendra Pawar
Man Yedyagat Zala: लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक करणार अभिनय क्षेत्रात पदार्पण; स्वानंदी आणि सुमेध यांचा सिनेमा 'या' दिवशी होणार रिलीज

निवडणुकीत काय भूमिका घेणार?

सुप्रिया सुळेंच्या प्रचाराच्या आवाहनावर युगेंद्र म्हणाले की, सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यात मला आनंद होईल. मी साहेबांचा (शरद पवारांचा) खूप आदर करतो. त्यांनी माझ्याबद्दल बोलणं हे माझ्यासाठी ऊर्जा देणारं आहे. साहेबांनी सांगितलं तर मी लोकसभा मतदारसंघात दौरा करणार आहे.

काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी कुटुंबात एकटं पाडल्याची भावना व्यक्त केली होती. त्यावर युगेंद्र पवार म्हणाले की, कुटुंबात एकलं पाडलं जातंय, कुटुंब फुटलंय असं मला वाटत नाही. कुटुंब एकच आहे. कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं ठेवलं पाहिजे.

Yugendra Pawar
Vidya Balan : 'विद्या बालन'च्या नावानं सोशल मीडियावर घातला गंडा, अभिनेत्रीनं दाखल केली FIR! नेमकं काय आहे प्रकरण?

''निवडणुकीसाठी एक महिना आहे, त्यामुळे काय निर्णय घ्यायचा हे नंतर बघूया. मी राजकारणात नसतानाही ग्राऊंड लेव्हला काम करत आलेलो आहे. जे करत आलेलो आहे तेच पुढेही करत राहणार आहे. शरद पवार म्हणतील तसंच पुढे काम करत राहणार.'' असं युगेंद्र यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.