Ajit Pawar
Ajit PawarEsakal

Ajit Pawar: ‘अजितदादांकडे गेलो मात्र.., त्या बैठकीशी माझा संबंध नाही’, शरद पवार गटाच्या आमदाराने सांगितलं भेटीचं कारण

राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यापासून अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे
Published on

राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाल्यापासून अनेक आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा दिला आहे. तर काल शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे देवगिरी बंगल्यावर अजित पवारांना भेटण्यासाठी गेले होते. देवगिरी बंगल्यावर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटातील नेत्यांची बैठक सुरू असताना तनपुरे देखील गेले होते. मात्र, तनपुरे आणि अजित पवारांची भेट न झाल्याची माहिती मिळाली आहे. यावर प्राजक्त तनपुरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई येथे काल(मंगळवार) सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटण्यासाठी देवगिरी बंगल्यावर गेलो होतो. त्यांनी बोलाविलेल्या बैठकीसाठी गेलो नव्हतो, तर मतदारसंघातील विविध विकासकामांची निवेदने घेऊन गेलो होतो. परंतु, उपमुख्यमंत्री पवार यांची भेट झाली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Ajit Pawar
Nanded Hospital Deaths : नांदेडच्या शासकीय रुग्णालयात परिस्थिती खरोखरच वाईट; मंत्री हसन मुश्रीफांची कबुली, म्हणाले...

आमदार तनपुरे म्हणाले की, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री आहेत. मतदारसंघातील अनेक विकासकामे निधी अभावी प्रलंबित आहेत. आज सायंकाळी देवगिरी बंगल्यावर पवार यांची भेट होऊ शकते, अशी माहिती मिळाल्याने विकासकामांची निवेदने घेऊन त्यांच्याकडे गेलो होतो. 

Ajit Pawar
Pune News : पुण्यातील ससूनमधून पळालेल्या ड्रग्स पेडलर प्रकरणी धक्कादायक माहिती समोर; पुणे पोलिसांनी...

त्यांनी बोलाविलेल्या बैठकीशी माझा काडीमात्र संबंध नाही. त्यांच्या बैठकीसाठी मी गेलो नव्हतो. मतदारसंघातील विकासकामांना निधी मागणे लोकप्रतिनिधी म्हणून माझे काम आहे. परंतु, उपमुख्यमंत्री पवार आजारी असल्याने ते उपचारासाठी रुग्णालयात गेले होते. त्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असेही आमदार तनपुरे यांनी सांगितले.

Ajit Pawar
Man Ki Baat: 9 वर्षे 105 एपिसोड, मोदींची 'मन की बात' सरकारसाठी मास्टर स्ट्रोक; झाला प्रचंड फायदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.