Sharad Pawar Group: आकडा कमी पण पावर जास्त, शरद पवारांच्या पारड्यात आहेत 'इतके' आमदार

Rashtravadi Congress : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या शपथविधीमुळे मोठी उलाढाल सुरू झाली आहे. तर पक्षातील आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यामध्ये कोणत्या पवारांना पाठिंबा द्यायचा याबाबत मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा दिवस आहे. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून आमदारांना व्हीप बजावण्यात आलाय.

एकीकडे अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार कोण हे अद्याप स्पष्ट झालेलं नव्हतं.

आज अजित पवारांना पाठिंबा देणारे आमदार किती आणि शरद पवार यांना पाठिंबा देणारे आमदार किती हे स्पष्ट झालं आहे. शरद पवार यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या 13 इतकी आहे.(Latest Marathi News)

मुंबईतील वायबी चव्हाण सेंटरमध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील बैठकीला एकूण 13 आमदार, आणि 5 खासदार उपस्थित आहेत.

यामध्ये अनिल देशमुख, रोहित पवार, राजेंद्र शिंगणे, अशोक पवार, किरण लहमटे, प्राजक्त तनपुरे, बाळासाहेब पाटील, जितेंद्र आव्हाड, चेतन विठ्ठल तुपे, जयंत पाटील, राजेश टोपे, संदीप क्षीरसागर आणि देवेंद्र भुयार या १३ आमदारांचा समावेश आहे.

अजित पवार यांनी रविवारी समर्थक आमदारांना घेऊन शिवसेना- भाजप सोबत युतीत सहभाग घेतला. त्यानंतर राष्ट्रवादीत मोठी उलाढाल झाली. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या 54 आमदारांपैकी एकूण 13 आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. (Latest Maharashtra News)

Sharad Pawar
Eknath Shinde rebel : शरद पवारांच्या पट्टशिष्याला शिंदेंच्या बंडाची कल्पना होती, सूरतला जाण्यासाठी केली मदत?

तर पुन्हा पक्ष बांधणीसाठी शरद पवार महाराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या नाशिकपासून ते दौऱ्याची सुरुवात करणार आहेत. तर येवल्यात 8 जुलै रोजी पहिली सभा होणार असल्याचे समजते आहे. (Latest Maharashtra News)

Sharad Pawar
Ajit Pawar Latest News : 'अजितदादांना सकाळी भेटले पण...',सुप्रिया सुळेंचं 'त्या' भेटीवर स्पष्टीकरण

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी नऊ आमदारांसह शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यांनतर राज्यातील राजकारण तापलं आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून आमदारांवर कारवाई केली जात आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी शरद पवार हे आता महाराष्ट्र दौरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील नाशिक, नागपूर, सोलापूर आदींसह महत्वाच्या जिल्ह्यांचा दौरा शरद पवार करणार असल्याची माहीती आहे. शरद पवार हे दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून करणार असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.