मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून (cm uddhav thackery) भाजपला धारेवर धरत खडेबोल सुनावले होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीवरून देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. त्यानंतर आता दोन्ही एकत्र येत शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (ता.१८) महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.
शरद पवार व मुख्यमंत्री यांची महत्त्वाची बैठक
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज 18 ऑक्टोबर रोजी सह्याद्री अतिथिगृहात दुपारी 12.30 वाजता महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत राज्यातील महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे.
राजकारणावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, राष्ट्रवादीच्या मंत्री आणि आमदारांवर ईडीकडून अनेक कारवाया झाल्या आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर आणि विरोधी पक्ष भाजप करत असलेल्या राजकारणावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टी आणि परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. तसेच राज्यात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून अनलॉक करून अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यावरही चर्चा होणे शक्य आहे. त्या
महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येईल याची खात्री - शरद पवार
भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या टिकेला प्रत्युत्तर देत शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांची पाठराखण केली होती. 'महाविकास आघाडीचे सरकार झाले, तेव्हा हे सरकार बनवण्यासाठी तिन्ही पक्षांचा हात होता. माझाही त्यात सहभाग होता. त्यावेळी उध्दव ठाकरे मुख्यमंत्री व्हायला तयार नव्हते. तेव्हा मी उद्धव ठाकरे यांचा हात धरून उंचावला आणि उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होतील हे मी सांगितलं. त्यांना सक्तीने हातवर करावा लागला' असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. तसंच, 'भाजपने किती छापे मारले, ठीक आहे, त्यांना किती कारवाई करायची आहे त्यांनी करावी, पण हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे. आणि पुन्हा सत्तेत येईल याची मला खात्री आहे' असा विश्वासही पवारांनी व्यक्त केला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.