Sharad Pawar : ''महाराष्ट्रात बंड का घडलं? कारण काय?'' शाहू महाराजांनी थेट मंत्र्यालाच विचारलं; पण आजपर्यंत ते मंत्री...

shahu maharaj on Sharad Pawar
shahu maharaj on Sharad Pawaresakal
Updated on

कोल्हापूरः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची आज कोल्हापुरात सभा आयोजित करण्यात आलेली होती. शरद पवार यांच्या अगोदर शाहू महाराजांनी आपले विचार मांडले. शाहू महाराजांनी राज्यातील एका मंत्र्याचा किस्सा सांगून सध्याच्या राजकारणावर प्रकाश टाकला.

शाहू महाराज म्हणाले की, काही दिवसांपूर्वी एक मंत्री मला भेटायला आले होते. त्यांना मी एकच प्रश्न विचारला, हे जे घडलं आहे ते कसं आणि का घडलं? सेशन संपल्यावर निवांतपणे मला हे सांगा. परंतु त्यांनी अजून स्पष्टीकरण दिलेलं नाही. हा जाब आपल्यालाच विचारावा लागेल, असं आवाहन शाहू महाराजांनी केलं.

अजित पवारांनी केलेल्या बंडाच्या मुद्द्यावर शाहू महाराज बोलत होते. त्यानंतर त्यांनी पक्षांतर बंदी कायद्यावर विस्तृतपणे भाष्य केलं आणि हा कायदा आणखी मजबूत व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

shahu maharaj on Sharad Pawar
Rohit Pawar : ''पारंब्यांना वाटतंय वटवृक्ष आपल्यावरच अवलंबून आहे...'' रोहित पवारांची पहिल्यांदाच अजित पवारांवर टीका

पुढे बोलताना शाहू महाराज म्हणाले की, पवार साहेबांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार आपल्याला महत्त्वाचा आहे. या विचारानेच आपण एवढी वर्षे गाठली आहेत. याच विचाराने भारताला स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्यानंतर आज आपली दिशाभूल होतेय का, असं सर्वांना वाटू लागलं आहे. पुन्हा एकदा योग्य दिशेने येण्याची गरज आहे. पुरोगामी विचारांचे लोक एकत्र राहिले तर पुन्हा आपण राजकारणात बदल करु शकू.

shahu maharaj on Sharad Pawar
Sharad Pawar Kolhapur Sabha: अन् शरद पवारांनी त्याला गर्दीतून स्टेजवर बोलावले, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड गेले घ्यायला

''पवार साहेब अनेकदा मुख्यमंत्री राहिले. महाराष्ट्रावर संकट कोसळलं तेव्हा पवार साहेब दिल्लीतून राज्यात आले होते. दंगली पेटल्या होत्या तेव्हा त्यांनी महाराष्ट्रात शांतता प्रस्थापित केली होती. नंतर ते कृषीमंत्री होते. त्यांच्यामुळेच शेतकरी उंच मानेने जगू शकला. पण आज दिल्लीमध्ये शेतकऱ्याचं काय सुरुय हे दिसतंय. पंजाबच्या शेतकऱ्यांना किती वेठीस धरलं, हे देशाने बघितलं आहे. त्यामुळे आपण योग्य मार्गाने चाललं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()