Sharad Pawar: पवार जाणते राजे नाही तर मुघल शहेनशाहच; भाजपचा पवारांवर हल्लाबोल

ट्वीट करत भाजपने शरद पवार यांच्यावर केली टीका
Sharad Pawar: पवार जाणते राजे नाही तर मुघल शहेनशाहच; भाजपचा पवारांवर हल्लाबोल
Updated on

दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय संमेलन काल पार पडले. याचवेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एंट्रीला कार्यकर्त्यांनी 'जोधा अकबर' या बॉलिवूड चित्रपटातील 'अज़ीम-ओ-शान शहंशाह' हे गाणं लावलं. त्यावरुन ट्वीट करत भाजपने शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.

पवार साहेबांची दिल्लीतील 'शहंशाह' हीच खरी ओळख आहे, अशा शब्दात भाजपच्या ट्विटरवरुन निशाणा साधण्यात आला आहे. हा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत.

दिल्लीतल्या सत्ताधाऱ्यांना आमचा पक्ष कधीही शरण जाणार नाही, भाजपला केंद्रातून सत्ताच्युत करण्यासाठी सर्व बिगरभाजप पक्षांनी एकत्र यावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय संमेलनात बोलताना केले आहे. राष्ट्रीय संमेलनावेळी पवारांचे व्यासपीठावर आगमन होत असताना उत्साही कार्यकर्त्यांनी मंडळींनी 'अज़ीम-ओ-शान शहंशाह' हे गाणं लावलं. अज़ीम-ओ-शान शहंशाह' हे गाणं सम्राट अकबराच्या गुणगान सांगण्यासाठी आहे. हाच दुवा पकडून भाजपने टीका केली आहे.

भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनीही ट्वीट करुन राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. 'दिल्लीच्या अधिवेशनात अझीम ओ शान शहेनशाह हे गाणं वाजवलं. आम्हीही तेच म्हणत होतो हे जाणते राजे नसून मुघल शहेनशाहच आहेत. कोणते? ते आपल्याला माहितीच आहे...' असं ट्वीट करत भातखळकरांनी पवारांना टोला लगावला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.