Sharad Pawar : ''पक्ष मी स्थापन केला, पक्षाचा अध्यक्ष मी आहे'', कोल्हापुरातून शरद पवारांनी ठोकला शड्डू

Sharad Pawar PC : कोल्हापुरात सकाळी ८ वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील तिढे आणि राज्यातील घटकपक्षांच्या बैठकांबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.
 Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

कोल्हापूरः कोल्हापुरात सकाळी ८ वाजता शरद पवारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील तिढे आणि राज्यातील घटकपक्षांच्या बैठकांबाबत भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयावर कडक शब्दांत ताशेरे ओढले.

सुरुवातीला बोलताना शरद पवार म्हणाले की, इंडिया आघाडीने एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. काही राज्यांमध्ये विवाद आहेत. त्यामुळे त्या-त्या राज्यातील घटकपक्षांनी एकत्र येऊन तिढे सोडवले पाहिजेत. काही ठिकाणी काँग्रेसच्या विरोधात प्रादेशिक पक्ष लढतात, तसे तिढे सुटले पाहिजेत. त्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी बसून तोडगा काढला पाहिजे. राज्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकरांसोबत आमच्या चर्चा झालेल्या आहेत. त्यासंबंधात उद्या आणखी बैठक होणार असून त्यावर चर्चा होणार असल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.

 Sharad Pawar
Fali S Nariman passes away: प्रख्यात कायदेतज्ज्ञ फली एस नरिमन यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाबतीत दिलेल्या निर्णयावर शरद पवार म्हणाले की, पक्ष मी स्थापन केला, पक्षाचा अध्यक्ष मी आहे. तरीही तो पक्ष आमच्या हातातून काढून दुसऱ्याच्या हातात दिला, पक्षचिन्ह दुसऱ्याच्या हातात दिलं. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत. कोर्टाने म्हटलंय, पक्ष चालवण्याचा अधिकार आम्हाला आहे. चिन्हासंबंधी वेगळा निकाल असेल तर आयोगाने सात दिवसांच्या आत निर्णय घेण्याचंही कोर्टाने म्हटलं आहे.

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगावर ताशेरे ओढल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं. सुदैवाने देशाची न्यायव्यवस्था आशेचा किरण दाखवणारी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयांसंबंधी आम्ही सर्व विरोधी पक्षांनी आयोगाशी पत्रव्यवहार केला होता. परंतु आम्हाला भेटण्याची गरज नसल्याचं आयोगाने म्हटल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

 Sharad Pawar
Farmers Protest: केंद्रासोबतची बोलणी फिस्कटली, शेतकरी आक्रमक; जेसीबी-पोकलेन घेऊन आज दिल्लीकडे होणार रवाना

अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशावर शरद पवार म्हणाले, त्यांनी तसा निर्णय घेतल्यानंतर आमच्यातल्या काहींना आश्चर्य वाटलं. परंतु मला त्याबाबत काहीही आश्चर्य वाटलं नाही. कारण केंद्र सरकारने काढलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श सोसायटी घोटाळ्याचा उल्लेख होता. हा एक धमकावण्याचा प्रकार होता. त्याचे परिणाम जे व्हायला पाहिजे होते, ते झाले. असं म्हणत पवारांनी चव्हाणांच्या प्रवेशावर भाष्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()