स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांचे अनेक प्रश्न प्रलंबित पडल्याने राज्यात गेल्या काही दिवसांपासून हे उमेदवार आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. अशात अता याप्रकरणी माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लहिले आहे.
शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या या पत्रात, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या अडचणी, परीक्षांना होणारा वेळ, त्यामुळे त्यांच्यात निर्माण होणारा असंतोष आणि निवड झालेल्या उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्या हे मुद्दे मांडले आहेत.
याचबरोबर पवार यांनी या पत्रात शिक्षक आणि प्राध्यापक भरतीसाठीही पाऊले उचलण्याची विनंती केली आहे.