Sharad Pawar: शरद पवारांचे PM मोदींना पत्र; काय आहे कारण?

Sharad Pawar
Sharad Pawaresakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हिराबेन (वय ९९) आजारी पडल्याने त्यांना येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासाने सांगितले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहित त्यांच्या आईच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली आहे. (Sharad Pawar letter to PM Modi mother heeraben in hospital condition stable )

शरद पवार यांनी ट्विट करत पंतप्रधान मोदींना आईच्या तब्येतीसंदर्भात काळजी व्यक्त केली आहे. मला तुमच्या आईची प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळाली. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजल्याने दिलासा मिळाला. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारावी अशी प्रार्थना करतो. असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

काय म्हटलं आहे पत्रात?

काल तुम्ही अहमदाबाद मधील हॉस्पिटलमध्ये जाऊन आईच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आणि त्यात सुधारणा होत असल्याचे समजल्यानंतर मला बरं वाटलं. मला माहितीये तुमचे आणि आईचे संबंध फार जवळचे आहेत. तुमच्यासाठी हा कठीण काळ आहे, याची देखील मला जाणीव आहे.

Sharad Pawar
Pathaan Controversy: 'पठाण' मध्ये बदलणार दीपिकाची 'भगवी बिकिनी'? सेन्सॉर बोर्डानं सुचवले 'हे' बदल..

आई ही या जगातील सर्वात पवित्र अशी गोष्ट आहे. तुमच्या आयुष्याला आकार देण्याचे आणि उर्जेचा एक अखंड स्त्रोत बनण्याचे काम तुमच्या आईने केले. त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा होवो, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आपल्याला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.