Sharad Pawar: आरक्षण मुद्द्यावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य, वाचा ते नक्की काय म्हणाले

Maratha Reservation Sharad Pawar: ५० टक्के आरक्षण ७५ टक्के पर्यंत वाढवता येईल. तमिळनाडूमध्ये तर ७८ टक्के आरक्षण आहे.
Sharad Pawar
Sharad PawarEsakal
Updated on

Latest Sharad Pawar News: ‘‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच हवे. मात्र ते ५० टक्क्यांच्या आत आरक्षण मिळणे अशक्य आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कायद्यात बदल केला पाहिजे. त्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा. तमिळनाडूप्रमाणे राज्यातही आरक्षण मर्यादा ७५ टक्केपर्यंत न्यावी,’’ अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी गुरुवारी (ता.३) येथे केली.

‘‘मोदी-शहा महाराष्ट्रात धडक दौरे-सभा करून ‘महाविकास’चा विजय सोपा करीत आहे. त्यामुळे त्यांचे आभार अशी टिपणीही त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केली. पवार म्हणाले म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवे. ५० टक्क्यांच्या मर्यादेत आरक्षण देणे अशक्य आहे. मराठा समाजासह अन्य समाजाला आणखी जादा आरक्षणासाठी केंद्राने कायद्यात बदल करायला हवा. सध्याचे ५० टक्के आरक्षण ७५ टक्के पर्यंत वाढवता येईल. तमिळनाडूमध्ये तर ७८ टक्के आरक्षण आहे.’’

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील दौऱ्यावर टीका करताना ते म्हणाले, ‘‘विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी राज्यात वारंवार प्रचाराला यायला हवे. ते असे येत राहिले तर लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती होईल आणि राज्यात महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा येईल. विधानसभा निवडणुकीसाठी केव्हाही आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे दौरे वाढले आहेत. लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मादी यांच्या १८ ठिकाणी सभा झाल्या. त्यातील १४ ठिकाणी भाजपचा पराभव झाला. याच निकालाची विधानसभेसाठीही पुनरावृत्ती होईल. मोदी, शहा यांनी राज्यात सर्वाधिक सभा घ्याव्यात, त्याचा सर्वाधिक फायदा महाविकास आघाडीच्या विजयासाठी होईल.’’

जागावाटप लवकर व्हावे

विधानसभा निवडणूक जवळ आल्याने महाविकास आघाडीतील घटक पक्षात चर्चा सुरू झालेल्या आहेत. समन्वय समितीच्या बैठका सुरू आहेत. त्यात मी नाही. प्रदेशाध्यक्षांसह अन्य लोक चर्चा करीत आहेत. मात्र तातडीने जागा वाटपावर तोडगा निघाल्यास पुढील प्रचारास आणखी गती मिळेल. ७ ते ९ ऑक्टोबरला समन्वय समितीची बैठक होत आहे,’’ असे त्यांनी सांगितले.

ती ‘ऑफर’ आमची नाही !

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मला पंतप्रधान पदासाठी ‘ऑफर’ मिळाल्याचे सांगितले होते. त्यावर पवार म्हणाले,‘‘केंद्रात विरोधी पक्षाकडे किंवा आमच्याकडे पुरेसे बहुमतच नसल्यामुळे त्यांना ‘ऑफर’ देण्याचा विषयच येत नाही. मात्र गडकरी यांच्या कामांचे कौतुक आहे. ते स्पष्टपणे बोलतात. लाडकी बहीण योजनेबाबतही ते योग्य आणि नेमके बोलले आहेत.’’

देशाचे गृहमंत्री अमित शहा हे त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना लोकांपर्यंत जाण्यास सांगण्याऐवजी ते दुसऱ्या पक्षातील कार्यकर्ते फोडून आणा असे सांगत आहेत. हे अत्यंत चुकीचे आहे.

शरद पवार, ज्येष्ठ नेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.