Jayant Patil: बंडखोरांना कधीही साथ देणार नाही, जयंत पाटलांनी दिली कार्यकर्त्यांना शपथ

Jayant Patil:
Jayant Patil:
Updated on

आज राज्यात शरद पवार आणि अजित पवार यांच्या गटबाजीची खरी कसोटी लागली आहे. दोन्ही गटांनी पक्षाच्या सदस्यांची बैठक घेतली. अजित पवार रविवारी इतर आठ आमदारांसह शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले होते. त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावाही केला आहे. त्यामुळे राजकारण तापले आहे. दरम्यान शरद पवार यांनी बोलवल्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांना शपथ दिली.

काय दिली शपथ?

जयंत पाटील म्हणाले, "मी आज इश्वरसाक्ष शपथ घेतो की, आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षता आणि नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मी माझ्या जिवात जीव असेपर्यंत कार्यरत राहील. शरद पवार यांच्यापासून दुर गेलेल्या लोकांना मी कधी साथ देणार नाही. शरद पवार यांच्या विचाराच्या मार्गावरुन मी आज प्रतिज्ञा करत आहे. "

बुथ कमिटीवर जयंत पाटील म्हणाले, मला कुणाला आव्हान करायचं नाही. पण जाता सांगतो. आपण इथून जाताना ताकदीने काम करायला पाहीजे. मी बुथ कमिट्या, बुथ कमिट्या म्हणत होतो, असं आज कोणीतरी (अजित पवार) म्हणाले. पण अरे बुथ कमिटी केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही हे मी नाही नरेंद्र मोदी सांगतात.

Jayant Patil:
Sharad Pawar Group: आकडा कमी पण पावर जास्त, शरद पवारांच्या पारड्यात आहेत 'इतके' आमदार

जयंत पाटील यांनी आजच्या बैठकीमध्ये जी भूमिका मांडली त्यावरुन त्यांच्या मनातील व्यथा समोर आली आहे. पाटील यांनी याअगोदर राष्ट्रवादीतील गटबाजीवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले होते.

पाटील म्हणाले, पहिल्यापासून साहेबांबरोबर आहे. बडवे असा शब्द वापरला जात आहे. खूप वाईट वाटते. मला पाच वर्षे पूर्ण झाली हे मला माहिती आहे तेव्हा आता मला कार्यमुक्त करा असे सांगितले. अशी भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी पाटील यांनी छगन भुजबळ यांच्या आरोपांना जशास तसे उत्तर दिले आहे.

Jayant Patil:
Jayant Patil :'पाच वर्षे झाली सुट्टी घेतली नाही, आता सुट्टी द्या'!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.