Sharad Pawar: वस्तादाची खेळी सुरुच, आणखी एक आमदार 'तुतारी' फुंकणार? शरद पवारांची ताकद वाढणार!

Solapur Latest News: , आमदार शिंदे यांच्या भूमिकेनंतर माढ्याचा महायुतीचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsakal
Updated on

राज्यात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अजित पवार गटाचे अनेक नेते आणि आमदार शरद पवार गटाकडे जात असतानाच आज माढ्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे

. अजित पवार यांचे कट्टर समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी अजित पवार आणि महायुतीची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याचा आमदार शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar: सर्वात मोठी खेळी! शरद पवारांच्या पक्षात हा मोठा पक्ष होणार विलिन; हजारो कार्यकर्त्यांचा या दिवशी प्रवेश

आमदार बबनराव शिंदे आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. आमदार शिंदे यांनी शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांना साथ दिली होती. लोकसभा निवडणुकीनंतर आमदार बबनराव शिंदे यांना मतदारसंघातील राजकीय परिस्थितीचा अंदाज


आल्यानंतर त्यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेऊन उमेदवाराची मागणी केली होती. परंतु, माढ्यातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिंदे यांना उमेदवारी देण्यास विरोध केला आहे. वाढता विरोध पाहता आमदार शिंदे यांनी मुलाला अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar News: हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशावर शरद पवार काय म्हणाले?

आमदार शिंदे म्हणाले, शरद पवार यांची दोन वेळा भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. त्यांनी अद्याप कोणालाच उमेदवारीचा शब्द दिला नाही. शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तर माझा मुलगा रणजितसिंह हा माढ्यातून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. यातून आमदार शिंदे यांनी शरद पवार यांनाही सूचक इशारा दिल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, आमदार शिंदे यांच्या भूमिकेनंतर माढ्याचा महायुतीचा उमेदवार कोण? याची चर्चा सुरू झाली आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar यांच्या आरक्षणावरील वक्तव्यावर जरांगे पाटील काय म्हणाले?| Maratha Reservation

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.