Sharad Pawar: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा हडपसरचा उमेदवार ठरला? 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मविआची तयारी जोरदारपणे सुरु झाली आहे.
Supriya Sule
Supriya SuleeSakal
Updated on

पुणे : लोकसभा निवडणुकीतील घवघवीत यशानंतर विधानसभा निवडणुकीसाठी मविआची तयारी जोरदारपणे सुरु झाली आहे. त्यानुसार, पुण्यातून एक महत्वाची बातमी आता समोर आली आहे. त्यानुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडून हडपसर विधानसभा मतदारसंघातून एका नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. साम टीव्ही न्यूजनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Sharad Pawar NCP candidate for Hadapsar Vidhan Sabha Constituency Prashant Jagtap name in discussion)

Supriya Sule
Patanjali MBBS: NEET परीक्षेतील गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पतंजलीची मोठी घोषणा; रामदेव यांनी सांगितला प्लॅन

सामच्या वृत्तानुसार, पुण्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रशांत जगताप यांचा फोटो व्हॉट्सअॅपला फिक्स आमदार असं स्टेटस ठेवलं आहे. प्रशांत जगताप हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पुणे शहराध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही प्रशांत जगताप हे शरद पवारांसोबत कायम राहिले आहेत.

Supriya Sule
BS Yediyurappa: येडीयुरप्पांना दिलासा! POCSO अंतर्गत होणारी अटक तुर्तास टळली; हायकोर्टानं काय म्हटलंय वाचा?

दरम्यान, सध्या हडपसरचे विद्यमान आमदार हे चेतन तुपे हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत. त्यामुळं या ठिकाणी शरद पवारांच्या गटाकडून नव्या चेहऱ्याची चाचपणी सुरु झाली आहे. यापार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांच्यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांची लॉबिंग सुरु झाली आहे.

Supriya Sule
Prataprao Jadhav: पुस्तकाची तुला करताना खासदार प्रतापराव जाधव दुसऱ्या पारड्यात बसले अन्....; व्हिडिओ व्हायरल

राज्यात दोन प्रमुख पक्षांमध्ये फूट पडली असल्यानं यंदाच्या विधानसभा निवडणूक ही अत्यंत वेगळी असणार आहे. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीप्रमाणं ती उत्कंठापूर्णही असेल. त्यामुळं अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी आता वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.