Maharashtra Politics : ठाकरेंनंतर शरद पवारांनीही गमावला पक्ष... राज्यात राजकारणात काय फरक पडणार?

Maharashtra Politics Latest News : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सतत काहीतरी घडताना पाहायला मिळत आहे.
Maharashtra Politics Latest News
Maharashtra Politics Latest News
Updated on

Maharashtra Politics Latest News : महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून सतत काहीतरी घडताना पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा शिवसेनेत पडलेली फूट आणि त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील दोन गट पडले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवारांना मोठा धक्का देत राष्ट्रवादी पक्ष आणि 'घड्याळ' हे निवडणूक चिन्ह अजित पवारांना दिलं आहे. हा शरद पवारांना मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवारांनी सुरुवातीला शरद पवारांच्या विरोधात जाऊन भाजप आणि शिंदे गटाशी हातमीळवणी केली. ते सत्तेत सहभागी होत उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. यानंतर आता निवडणूक आयोगाने त्यांना राष्ट्रवादी पक्ष देखील दिला आहे.

राज्यातील राजकारणात बड्या मानल्या जाणाऱ्या दोन पक्षात फूट पडली आहे. शरद पवार अशी ओळख असेला राष्ट्रवादी पक्ष आता अजित पवारांकडे गेला आहे. इतकेच नाही तर आता घड्याळ या चिन्हावर देखील अजित पवारांचा हक्क असल्याचे स्पष्ट झालं आहे. तर दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंनी उभी केलेली शिवसेना ही त्यांचाच मुलगा असलेल्या उद्धव ठाकरेंकडे नसून एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे.

दोघांसमोर अडचणी सारख्याच...

सध्या शिवसेनेचे दोन गट झाल्यावर आता राष्ट्रवादीत देखील तीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना शिवसेना सोपवणअयात आली होती आता अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देण्यात आला आहे. दोन्ही प्रकरणात महत्वाची भूमिका आहे ती सर्वोच्च न्यायालायाची. या दोन्ही प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालय यान निर्णय घेतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. याचा सर्वोच्च न्यायालयाने काहीही निर्णय दिला तरी आगामी लोकसभा निवडणूकीत या दोन्ही प्रकरणाचा मोठा परिणाम पाहायला मिळणार हे मात्र निश्चित आहे.

आगामी लोकसभा निवजणुकीत अजित पवार आणि एकनाथ शिंदे सोबत आल्याने भाजपची स्थिती मजबूत होताना दिसत आहे. निवडणूकीत प्रत्यक्ष किती फायदा होईल ते पाहाणे महत्वाचे ठरणार आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांना मिळाल्याने महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीवर कसा परिणाम होईल याकडे देखील राजकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे लक्ष असणार आहे.

सध्या देशातील विरोधीपक्षांची स्थिती म्हणावी तेवढी चांगली नाहीये, राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख जरी शरद पवार असले तरी अजित पवारांनी मागिल काही वर्षात स्वतःचं स्थान पक्क केलं आहे, त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे. शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, प्रफुल्ल पटेल आणि धनंजय मुंडे अशी बरेच बडे नेते सध्या अजि पवारांसोबत आहेत. त्यामुळे अजित पवारांना मोठं समर्थन असल्याचे दिसून येत आहे.

Maharashtra Politics Latest News
"कुणाला सांगता म्हतारा झालो... तुम्हाला काय ठाऊक आहे अजून...", निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा Video चर्चेत

उद्धव ठाकरे हे देखील त्यांना बसलेल्या धक्क्यांपासून सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षात पडलेल्या फुटीनंतर पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी त्याच्यांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. सत्तेत असलेल्या एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने उद्धव ठाकरेंकडे फारसे पर्याय शिल्लक नाहीयेत. ठाकरे जनतेच्या दरबारात जाऊन सध्या न्याय मागताना दिसत आहेत.

असे असले तरी उद्धव ठाकरे यांच्यामागे लोकांची सहानुभूती हा मोठा फॅक्टर ठरणार आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार-खासदारांनी गद्दारी केल्याचं व्हिक्टीम कार्ड ठाकरेंकडे आहे. सहानुभूतीच्या जोरावर इतिहासात अनेकदा निवडणूका जिंकल्या गेल्या आहेत. त्यामुळे याच मुद्द्यावर उद्धव ठाकरे आणि शरद पवार काही चमत्कार करू शकतील का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Politics Latest News
NCP Crisis : नव्या जोमाने मतदारांना सामोरे जाऊ; पुण्यातील शरद पवार गटाचे नेते व पदाधिकारी यांचा निर्धार

आव्हानं काय आहेत?

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यापुढे सध्या सारखीच आव्हाने आहेत. त्यामध्ये सर्वात मोठं आव्हान आहे ते स्वतःची ओळख निर्माण करण. शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख तर उद्धव ठाकरेंची शिवसेना हीच ओळख आहे, मात्र मते देताना लोकांसमोर वेगळ नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यामुळे कमी वेळात मतदारांना विशेषतः ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत पोहचून त्यांना जागरुक करणे हे दोन्ही गटांपुढील सर्वात मोठे आव्हान असणार आहे.

शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे तळागाळातील लोकांपर्यंत कसे पोहचतात आणि त्यांना कसे समजावून देतात हे महत्वाचे ठरणार आहे. कारण ग्रामीण भागात राहणारे लोक सहसा निवडणूक चिन्ह पाहूण मतदान करताना दिसतात. त्यामुळे या आव्हानाचा सामना दोन्ही नेत्यांना करावा लागणार आहे.

शरद पवारांकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह जाण्याचे परिणाम मोठे असणार आहेत. हा मुद्दा फक्त शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यापुरता मर्यादीत असणार नाहीये. कारण सध्या राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी स्थापन झाली आहे. महाराष्ट्रात देखील याच आघाडीत पक्ष निवडणुका लढवणार आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली नसती तर भाजपला निवडणूक जिंकणँ कठीण गेलं असतं. शिवसेना शहरी भागात तर राष्ट्रवादीची पश्चम महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्यात घट्ट पकड आहे. मात्र पक्षात फूट पडल्याने आता भाजपला पराभूत करणं कठीण जाणार आहे.

Maharashtra Politics Latest News
NCP Party and Symbol: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हातून गेला आता शरद पवारांकडे कोणता पर्याय? नवं नाव अन् चिन्ह की....

विरोधकांची गणितं बिघडणार?

राज्यात विरोधकांची गणितं बिघडू शकतात, कारण अजित पवारांसारखा मोठा विरोधीपक्षातील नेता आता सत्तेत सहभागी झाला आहे. तसेच शिंदेच्या रुपात मोटी व्होटबँक भाजपच्या सोबत आहे. याचा थेट फायदा भाजपला होणार आहे. ज्या जागांवर विजय मिळणं थोडं कठीण होतं आता तिथं भाजपला विजयाची संधी मिळू शकते.

भाजपकडे सध्या महाराष्ट्रात लोकसभेचे २३ खासदार आहेत आणि भाजप ही संख्या वाढवण्याचा प्रयत्नात आहे. अजित पवार आणि एकनाथ शिंदेंच्यामदतीने हे शक्य होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची सहकार क्षेत्रावर घट्ट पकड आहे, याच्या माध्यमातून २५ वर्षांपासून पाच कोटीहून अधिक लोक पक्षाची व्होटबँक बनले आहेत. अजित पवार एनडीएमध्ये गेल्याने ही मतांमध्ये काही प्रमाणात फूट पाहायला मिळू शकते. मात्र एकनाथ शिंदेना सोबत घेतल्यानंतर काही पोटनिवडणूकीत यश मिळालेलं नाहीयेष त्यामुळे हा भाजपच्या चिंतेचा विषय बनला आहे. कागदावर सध्यातरी भाजपचं पारडं जड दिसून येत आहे मात्र अनुभव आणि पावरच्या बाबतीत विरोधक मजबूत आहेत त्यामुळे लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील ४८ जागांवर काय निकाल लागतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.