Sharad Pawar: राज्यातील OBC मतं आपल्याकडे वळवण्यात पवारांना यश येईल का? 'ही' मोहीम यशस्वी झाल्याचा पक्षाचा दावा

Obc Voters In maharasthra: महाराष्ट्रात जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस ची जागा आहे तिथे तिथे आम्ही जाऊन आलो
Sharad Pawar: राज्यातील OBC मतं आपल्याकडे वळवण्यात पवारांना यश येईल का? 'ही' मोहीम यशस्वी झाल्याचा पक्षाचा दावा
Updated on

बा. पु. गायकर

Latest Marathwada News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलच्या वतीने महाराष्ट्रातील विविध विधानसभा मतदारसंघांमध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले . महाराष्ट्रातील विविध मतदार संघात २१ ते २ सप्टेंबर असा पहिला टप्पा पुर्ण झाल्यानंतर, दुसरा टप्पा ता.१४ ते १८ सप्टेंबर दरम्यान घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले.

ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापुर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे ध्येय धोरण आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी गेल्या ५०‌ वर्षातल्या राजकारणात दिलेले योगदान आणि ओबीसी संदर्भात केलेल्या कामाची माहिती देण्यात आली आहे. घोंगडी बैठकीचा महाराष्ट्रातील ४४ विधानसभा मतदारसंघात ३ हजार २०० गावात जाऊन तिचा समारोप लोहा -कंधार विधानसभा मतदारसंघात पत्रकार परिषदेत घेऊन करण्यात आले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.