Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest: केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागेल; शरद पवारांनी केलं मोठं भाकीत

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (गुरूवारी) ईडीने चौकशी करून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी अटक चुकीची आहे म्हणत शरद पवार यांनी आपला पाठिंबा दिला आहे.
Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest
Sharad Pawar on Arvind Kejriwal ArrestEsakal
Updated on

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल (गुरूवारी) ईडीने चौकशी करून अटक केली. त्यांच्या अटकेनंतर विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान अरविंद केजरीवाल यांनी अटक चुकीची आहे म्हणत शरद पवार यांनी केजरीवालांना आपला पाठिंबा दिला आहे.

निवडणुकीच्या काळामध्ये भाजपकडून भीती पसरवण्याचे काम सुरू आहे. आधी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक केली त्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक केली, उद्या कोणाला अटक करतील माहिती नाही असं म्हणत शरद पवारांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest: अटकेनंतर केजरीवाल मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार होणार का? काय सांगतो कायदा? जाणून घ्या

भाजप सत्तेचा गैरवापर केला जात आहे. राज्याच्या काही प्रमुख नेत्यावर ईडीचा वापर करून त्यांच्यावर कारवाई केली जाते. ज्या राज्यात ज्या नेत्यांचा प्रभाव आहे त्यांना तुरूगांत टाकण्याचं काम केलं जात आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे. याआधी राज्यातील काही महत्त्वाच्या नेत्यांना अटक केली त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांना अटक करण्यात आली, राज्यात धोरण ठरवणाऱ्या राज्याच्या राज्याच्या प्रमुखाला अटक करणं ही चुकीची गोष्ट आहे, ही चितेंची बाब आहे, असंही पुढे शरद पवार म्हणाले आहेत.

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Arrest: राहुल गांधी केजरीवालांना कायदेशीर मदत करणार; कुटुंबियांशी साधला संवाद

अरविंद केजरीवाल यांच्यावर कारवाई केली मात्र, त्याचा फायदा केजरीवालांच्या पक्षाला होईल, त्याच्या सर्व जागा निवडून येतील, दिल्लीची जनता केजरीवालांच्या बाजूने उभी राहिल असंही शरद पवारांनी म्हटलं आहे.

त्याचबरोबर ईडी, सीबीआयचा वापर करणे निवडणुकीच्या काळात दहशतीचं वातावरण निर्माण करणं या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो, आणीबाणीच्या काळात जे झालं नाही ते आता होत आहे, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपला मोजावी लागणार आहे, असंही ते पुढे म्हणालेत.

केजरीवाल हे दिल्लीत बसून मोदींच्या भूमिकेला विरोध करतात. त्यामुळेच त्यांच्याविरोधात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. भाजपला केजरीवालांच्या अटकेची किंमत मोजावी लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटलं.

Sharad Pawar on Arvind Kejriwal Arrest
Arvind Kejriwal Latest News: निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांना अटक! पक्षात हाहाकार, लोकसभा निवडणुकीची जबाबदारी 'या' दिग्गजांच्या खांद्यावर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.