Sharad Pawar: पंढरीच्या वारीत पायी चालणार का?, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं स्पष्ट

Sharad Pawar press conference: तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालत सहभागी होणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यावर आज झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी वारीत चालण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Sharad Pawar press conference
Sharad Pawar press conferenceEsakal
Updated on

राज्यात वारीचा उत्साह दिसून येत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यंदाच्या आषाढी वारीत सहभागी होणार असल्याची त्याचबरोबर 7 जुलैला तुकोबांच्या पालखीत वारकऱ्यांसोबत चालणार असल्याची माहिती समोर आली होती. तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यात शरद पवार बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालत सहभागी होणार असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. त्यावर आज झालेल्या पत्रकारपरिषदेत शरद पवार यांनी वारीत चालण्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी वारीत चालणार बातमी खोटी आहे. पुण्यात पार पडलेल्या पत्रकारपरिषदेत त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले, 'मी बारामती ते इंदापूरमधल्या सणसरपर्यंत पायी चालणार ही बातमी खोटी आहे. पंढरपूरला जाणारी वारी माझ्या गावावरून जाते. त्या ठिकाणी एक दिवस मी थांबणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी मी असणार आहे. मात्र मी पालखीसोबत चालणार नाही तर तिच्या स्वागतसाठी तिथे जाणार आहे.'

Sharad Pawar press conference
Sharad Pawar: 'निवडणूक, नको रे बाबा'; संजय राऊतांच्या 'त्या' शक्यतेवर शरद पवार स्पष्टच म्हणाले

विधानसभा निवडणुकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया

सध्या आमचे पूर्ण लक्ष हे विधानसभा निवडणुकीकडे आहे. ज्याप्रकारे अर्जुनाचे लक्ष हे पक्षाच्या डोळ्याकडे होते तसेच आमचं लक्ष हे उद्याच्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीकडे आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे हे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. जागा वाटपाची चर्चा लवकरच होणार असून सध्या आमच्या हातात तीन महिने आहेत. आमचे संपूर्ण लक्ष हे आगामी निवडणुकीकडे आहे.

Sharad Pawar press conference
Ladki Bahini Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण'साठी अर्ज करण्यास 'या' 15 दिवसांचीच मुदत! ही' कागदपत्रे जरुरी; कसा अन् कुठे करायचा अर्ज?

भारतीय संघाचं अभिनंदन

भारतीय संघाने अद्भूत प्रकारचा कारनामा केला. धावा कमी काडायच्या होत्या, पण शेवटी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि १७ वर्षांनंतरचा गॅप भरून काढला. टी-२० वर्ल्डकप जिंकला. राहुल द्रविड यांनी संघाला चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. मी भारतीय संघाचा, राहुल द्रविड यांचं आणि इतर सहकार्यांचं अभिनंदन करतो, असं शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar press conference
Sharad Pawar: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठीचा काय आहे महाविकास आघाडीचा प्लॅन? पवारांनी थेटच सांगितलं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()