हा आमच्या घरातला प्रश्न आहे. असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी खासदार संजय राऊत यांना सडेतोड उत्तर दिलं आहे. सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या राजीनामा नाट्यावर भाष्य करत 'वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले.' असा आरोप केला होता. त्यावर आता स्वतः शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (sharad pawar on Sanjay Raut saamana editorial )
काय म्हणाले शरद पवार?
लोकांनी मला थांबू दिले नाही. कार्यकर्त्यांच्या मागणीमुळे मी राजीनामा मागे घेतला. आम्ही पक्षात काय करतो हे राऊतांना माहिती नाही. आम्ही काय केलं ते त्यांना माहिती नाही.
पक्षातील अनेकांना कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली. आम्ही कुणाला संधी दिली आणि काय केलं हे जाहिर करत नाही. त्यामुळे कुणी आमच्यावर टीका केली तर दुर्लक्ष करतो.
आम्ही कधी प्रसिद्धी नाही करत. सामना अग्रलेखाला महत्त्व देत नाही. आम्ही काय करतो ते आम्हाला ठाऊक आहे. पक्षात काय होतं तो आमचा घरातला प्रश्न आहे. आम्ही आमचं काम करतो त्यांना काहीही लिहू दे, अशा शब्दात शरद पवार यांनी राऊत यांना उत्तर दिलं.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलं होतं?
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत.
त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’ असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच.
पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले व त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.