Sharad Pawar : ''लोकसभेच्या 'त्या' 27 जागांबद्दल अफवा", जागावाटपाबाबत शरद पवार बारामतीत नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar Latest News : राज्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. यादरम्यान महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत.
Sharad Pawar On Vanchit Bahujan Aghadi seat sharing for lok sabha election 2024 prakash Ambedkar politics marathi news
Sharad Pawar On Vanchit Bahujan Aghadi seat sharing for lok sabha election 2024 prakash Ambedkar politics marathi news
Updated on

बारामती : राज्यात आगामी लोकसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीला वेग आला आहे. यादरम्यान महाविकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. यादरम्यान वंचित बहुजन आघाडीने 27 जागांवर मागणी केल्याची बातमी निव्वळ अफवा असून त्यांनी केवळ सहा जागांची मागणी केल्याची माहिती जेष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी अनोपचारिक संवाद साधताना दिली. (Sharad Pawar On Seat Sharing with VBA)

वंचित सोबत आघाडी व्हावी यासाठी स्वतः मी आग्रही असल्याचेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले. वंचितने जास्त जागा मागितल्या याबाबत कार्यकर्ते व माध्यमांचाही गैरसमज झाल्याचे पवार म्हणाले. वंचित आघाडीची एक स्वतःची व्होट बँक असून ती महत्त्वाची असल्याचे पवार यांनी नमूद केले.

Sharad Pawar On Vanchit Bahujan Aghadi seat sharing for lok sabha election 2024 prakash Ambedkar politics marathi news
Viral Video : अनंत अंबानींचे कोट्यवधींची घड्याळ पाहून झुकरबर्गही शॉक्ड! 'इतकी' आहे किंमत

दरम्यान माढा लोकसभा मतदारसंघ महादेव जानकर यांच्यासाठी सोडण्याबाबतही शरद पवार यांनी सूचक वक्तव्य केले असून, धनगर समाजासाठी एक जागा सोडण्याची महाविकास आघाडीची भूमिका असल्याचेही त्यांनी या अनौपचारिक संवादात नमूद केले. महाविकास आघाडीची उद्या (ता. 4) बैठक होणार असून उद्धव ठाकरेंसह अनेक प्रमुख नेते या बैठकीस उपस्थित राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Sharad Pawar On Vanchit Bahujan Aghadi seat sharing for lok sabha election 2024 prakash Ambedkar politics marathi news
Tata Group: टाटाचा शेअर मार्केटमध्ये जलवा! 5 दिवसांत तब्बल 20 हजार कोटींची कमाई

बारामतीत विद्या प्रतिष्ठान मध्ये नमो महारोजगार मेळावा दहावीच्या परीक्षेच्या वेळेस घेणे हे अयोग्य होते, यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला, असे ते म्हणाले. दहावीच्या परीक्षेचे केंद्र बदलणार असे सांगितले गेले, प्रत्यक्षात ते केंद्र बदलले गेले नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला.

या नमो रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने हाउसकीपिंग सारख्या काही नोकऱ्या देऊन युवकांची फसवणूकच झाली असल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली. दरम्यान या मेळाव्याच्या प्रोटोकॉल मध्ये आपलं नाव जाणीवपूर्वक वगळण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांनी आज बारामतीत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधताना, केवळ गप्पा मारू असे सांगत पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. या संवादा दरम्यान त्यांनी अनेक विषयांवर पत्रकारांशी जवळपास अर्धा तास चर्चा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()