असा आहे शरद पवारांचा कार्यक्रम; नागपूरचे पोलिस आयुक्त म्हणाले...

Sharad Pawar on Vidarbha tour
Sharad Pawar on Vidarbha tourSharad Pawar on Vidarbha tour
Updated on

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी (ता. १०) अमरावती दौऱ्यावर येणार आहे. सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे. त्यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी आंदोलन केले होते. यामुळे तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात येणार असल्याची माहिती नागपूरचे पोलिस आयुक्त (Commissioner of Police) अमितेश कुमार यांनी दिली. (Sharad Pawar on Vidarbha tour)

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे जवळपास चार महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. शुक्रवारी चिडलेल्या शंभराहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानावर हल्ला केला होता.

Sharad Pawar on Vidarbha tour
एकाच कुटुंबातील ११ जणांना हवे इच्छामरण; राष्ट्रपतींना लिहिले पत्र

कर्मचारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बंगल्यावर दाखल झाले होते. कर्मचाऱ्यांनी बंगल्यावर चप्पल आणि दगडफेक केली होती. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पवार कुटुंबीयांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या घटनेची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी करण्याची मागणी केली आहे. या घटनेचा सर्वच स्तरावरून निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

अशात रविवारी शरद पवार (Sharad Pawar) विदर्भाच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता. त्यांच्या निवासस्थानावर शुक्रवारी हल्ला करण्यात आला होता. तरीही ते विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. नागपूर विमानतळावर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांचा सत्कार करणार आहेत. शरद पवार यांच्या स्वागतासाठी विमानतळावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी (Commissioner of Police) सांगितले.

Sharad Pawar on Vidarbha tour
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

शरद पवारांचा कार्यक्रम पुढील प्रमाणे

  • रविवारी सकाळी १०.३० वाजता नागपूर विमानतळावर आगमन

  • विमानतळावरून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण

  • दुपारी १ ते १.३० ही वेळ श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या निवासस्थानी राखीव

  • १.४५ ते २.१५ या वेळेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी सुरेखा ठाकरे यांच्या निवासस्थानी फिनले मिल कामगारांच्या बैठकीला मार्गदर्शन

  • दुपारी २.३० वाजता श्री. शिवाजी शिक्षण संस्थेच्या सभागृहाचे उद्‍घाटन व छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण

  • दुपारी ४.१५ वाजता माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या देवीसदन निवासस्थानी भेट

  • सायंकाळी ५ वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे विभागीय संवाद मेळाव्याला मार्गदर्शन

  • सायंकाळी ७ वाजता ते नागपूरकडे प्रयाण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.