सामान्य तरुणाला शरद पवार हे विमानातून औरंगाबादला सोबत नेतात तेव्हा...

Sharad Pawar Latest Marathi News
Sharad Pawar Latest Marathi NewsSharad Pawar Latest Marathi News
Updated on

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) हे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. यासाठी ते औरंगाबादला रविवारी गेले. आशावेळी भेटायला आलेल्या सामान्य तरुणाला शरद पवार यांनी विमानातून सोबत औरंगाबादला नेले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. डॉ. भरत चव्हाण असे तरुणाचे नाव आहे. (Sharad Pawar Latest Marathi News)

डॉ. भरत चव्हाण या तरुणाने ‘शरद पवार साहेबांसोबत बारामती ते औरंगाबाद (Aurangabad) विमानाने येतोय मित्रहो! ही संधी मिळणे आयुष्यातील सगळ्यात मोठा आनंदाचा क्षण आहे माझ्यासाठी’ असे फेसबुकवर लिहिले आहे. सोबत विमानातील व्हिडिओही शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओवर भरभरून प्रतिसाद येत आहे.

Sharad Pawar Latest Marathi News
शिवसेना जागेवरच, सेनेला अजिबात धक्का लागलेला नाही - संजय राऊत

शिवसेनेतील आमदारांच्या बंडानंतर मनसे नेते राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे देखील १७ जुलैपासून मराठावाड्यातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटनेचे काम करणार आहे. त्यापूर्वीच शरद पवार (Sharad Pawar) हे औरंगाबादमध्ये दाखल झाले. औरंगाबादवर (Aurangabad) प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे. औरंगाबादला जात असताना त्यांनी भेटायला आलेल्या युवकाला आपल्यासोबत नेले.

चव्हाण याने शरद पवार यांच्या सोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केला आहे. त्याच्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘आम्हाला अभिमान आहे तुम्ही आमच्या गावचे सरपंच आहात. भाग्यवान आहात भाऊ तुमाला आज विठ्ठल भेटलाय साक्षात’ अशी कमेंट एकाने केली.

‘खरंच डॉक्टर साहेब खूप नशीबवान आहात तुम्ही, तुमचं जीवन सार्थक झालं’ असे दुसऱ्याने लिहिले. कोणी या तरुणाला सरपंच म्हणत आहे. डॉ. भरत चव्हाण हा कुठला आणि सरपंच आहे की नाही, हे मात्र कळू शकलेले नाही.

...तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत

मी माझ्या काही अडचणी व प्रश्न शरद पवार साहेबांना भेटून त्यांच्या कानावर घालावे म्हणून भेटण्यासाठी औरंगाबादवरून बारामती गाठली. बारामतीचे नितीन यादव यांच्या मदतीने तिथे पोहचल्यावर थांबण्याची व्यवस्था झाली. साहेबांची भेटीचीही वेळ मिळाली. मला साहेबांना भेटण्यासाठी आवाज देण्यात आला. आत गेल्याबरोबर रात्रभर प्रवास करून थकलेला चेहरा पाहून साहेबांनी विचारलं कुठून आलात? मी औरंगाबादहून असे उत्तर दिले. मग साहेबांना अडचणी सांगितल्या. त्यांनी स्मितहास्य करीत ठीक आहे, बघतो मी, काळजी करू नका! असे म्हटले. मी धन्यवाद साहेब म्हणत बाहेर पडणार तोच साहेबांनी पुन्हा आवाज दिला आणि विचारले औरंगाबादवरून आला आहात ना परत कधी जाणार आहात? मी म्हटलं साहेब आता निघेल! साहेब बोलले थांबा मी पण आज औरंगाबादलाच जातो आहे. तुम्हाला हरकत नसेल तर चला माझ्यासोबत! मी हो म्हटले आणि त्यांच्यासोबत निघालो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.