Sharad Pawar Party Symbol : शरद पवारांच्या पक्षाचं नाव अन् चिन्ह ठरलं? जयंत पाटलांनी केलं ट्विट

निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा हा निकाल आज जाहीर केला.
Sharad Pawar_NCP
Sharad Pawar_NCP
Updated on

मुंबई : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा की अजित पवारांचा हा निकाल देताना राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ आणि पक्ष हे दोन्हीही अजित पवारांच्या गटाला दिलं आहे. त्यामुळं आता आगामी निवडणुकांसाठी शरद पवार गट कुठलं चिन्ह आणि पक्षाचं नाव वापरणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

निवडणूक आयोगानंही त्यांना उद्याच ७ फेब्रुवारीपर्यंत पक्षाचं नाव आणि चिन्ह संध्याकाळी ४ वाजेपर्यंत निवडणूक आयोगाला कळवण्याचे निर्देश दिले आहेत. (sharad pawar party name and symbol may be decided jayant patal tweeted)

जयंत पाटलांनी केलं सूचक ट्वीट

पण निवडणूक आयोगाच्या या निकालानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन त्यांच्या पक्षाचं चिन्ह आणि नाव सूचक पद्धतीनं जाहीर केलं आहे. जयंत पाटील यांनी एक फोटो ट्विट केला असून यावर राष्ट्रवादीच्या गोल घड्याळा प्रमाणं एका गोलामध्ये शरद पवारांचा फोटो त्याखाली 'शरदचंद्र गोविंदराव पवार' आणि वर 'आमचा पक्ष, आमचं चिन्ह' असं लिहिलेलं आहे. (Latest Marathi News)

Sharad Pawar_NCP
Explainer: नझूल जमिनींसाठी सरकारची 'अभय योजना'; लाभार्थी कोण?

उद्धव ठाकरेंच्या पक्षाची दिसणार छाप

जयंत पाटलांनी ट्विट केलेला हा फोटो म्हणजेच शरद पवार गटाचं चिन्ह आणि त्याखाली लिहिलेलं शरदचंद्र गोविंदराव पवार हे पक्षाचं नाव असल्याचं यातून सूचकपणे दिसून येत आहे. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षानं जसं 'उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे पक्षाचं नाव धारण केलं त्याच धर्तीवर शरद पवारांच्या गटानं आपल्या पक्षाचं नाव धारण केल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar_NCP
NCP Result: निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या पक्ष अन् चिन्हाबाबत दिलेला निकाल काय सांगतो?

अद्याप अधिकृत शिक्कामोर्तब नाही

फक्त जयंत पाटलांनीच हा फोटो ट्विट केला असून अद्याप इतर कोणीही ते ट्विट केलेलं नाही. त्यामुळं हेच पक्षाचं नाव आणि चिन्ह असेल हे अद्याप अधिकृत ठरलेलं नाही. तसेच शरद पवारांनी देखील अद्याप याबाबत आणि एकूणच निवडणूक आयोगाच्या निकालावर भाष्य केलेलं नाही. त्यामुळं स्वतः शरद जेव्हा पक्ष आणि चिन्हाबाबत माहिती देतील तीच अधिकृत समजली जाईल. (Marathi Tajya Batmya)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.