Sharad Pawar : अग्रलेख वाचला नाही, पण…; सामनातील टीकेवर शरद पवारांचे उत्तर, म्हणाले…

Sharad Pawar reaction to Saamana Editorial devendra fadnavis statement maharashtra politics
Sharad Pawar reaction to Saamana Editorial devendra fadnavis statement maharashtra politics esakal
Updated on

शरद पवरांनी राष्ट्रवादी पक्ष अध्यक्षपदाचा राजीनामा परत घेतल्यानंतर सामनामधून त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. राजीनामा नाट्यानंतर शरद पवार यांच्यावर सामना अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आलं आहे.

इतकचं नव्हे तर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करण्यात आली आहे. वारसदार निर्माण करण्यात पवार अपयशी ठरले असा आरोप सामना अग्रलेखात करण्यात आला आहे. याविषयी पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे

शरद पवार म्हणाले की, अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाहीये. सामना किंवा त्यांच्या संपादक हे सगळे आम्ही एकत्र काम करतो. एकत्र काम करताना पूर्ण माहितीवरच भाष्य करणं योग्य होईल. अन्यथा गैरसमज होतात. पण माझी खात्री आहे की त्यांची भूमिका ही ऐक्याला पोषक असेल.

यावेळी बोलताना पवारांनी स्पष्ट केलं की, हे खरं आहे की पक्षाचे कार्यकर्ते आणि अनेक हितचिंतक अस्वस्थ होते, पण सगळ्यांच्या आग्रहासाठी मला माझे निर्णय बदलावा लागला. निर्णय बदलला त्यात एक गैरसमज होता. अध्यक्षपद सोडलं म्हणजे संघटनेचं काम, लोकांशी संवाद सोडायचं ठरवलं नव्हतं. पण तो गैरसमज झाला. तो दूर झाला याचा आनंद आहे. माझी पद्धत आहे सुरूवात करायची असेल तर मी दोन ठिकणं निवडतो. एक सोलापूर नाहीतर कोल्हापूर असंही शरद पवार म्हणाले.

Sharad Pawar reaction to Saamana Editorial devendra fadnavis statement maharashtra politics
Weather Update: पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा; मोचा चक्रीवादळामुळे बदलणार हवामान

फडणवीसांना सडेतोड उत्तर

साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष म्हणणाऱ्या फडणवीसांनी देखील शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या प्रचारादरम्यान निपाणी इथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला होती. साडे तीन जिल्ह्यांचा पक्ष निपाणीत निवडणूक लढवतोय, त्यांचं पार्सल पॅक करून परत पाठवून द्या, आम्ही बघून घेऊ असे म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवरांनी प्रत्तुत्तर दिलं आहे.

मी निपाणीला चाललो आहे. त्यामुळे कोण पार्सल आहे अन् कोण किती वस्ताद आहे ते तिथं जाऊन खोलात बोलायचं इथं नाही, अशा शब्दात पवारांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं.

Sharad Pawar reaction to Saamana Editorial devendra fadnavis statement maharashtra politics
Sharad Pawar : शरद पवारांच्या निर्णयानंतर ठाकरेंचा गंभीर आरोप; राजकीय वर्तुळात खळबळ

मविआमध्ये काय चाललंय?

महाविकास आघाडीत काय चाललंय? या प्रश्नाला उत्तर देताना सगळं व्यवस्थित आहे, काळजी करू नका, असं उत्तर शरद पवरांनी दिलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.