Sharad Pawar Resign : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. गेल्या वर्षीच त्यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड झाली होती. शरद पवार यांच्या या घोषणेनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षाबाबत चर्चा रंगली आहे. पक्षातही धुसफूस सुरू झाली आहे. पक्षाचे कार्यकर्ते शरद पवार यांच्याकडे निर्णय मागे घेण्याची मागणी करत आहेत.
राज्यातील इतर पक्षांना देखील शरद पवार यांच्या निर्णयाचा धक्का बसला आहे. अनेक नेते त्यांचे मत व्यक्त करत आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात काल (मंगळवार) बरीच राजकीय उलथापालथ झाली आहे. शरद पवार यांच्या राजीनाम्याचे अनेक राजकीय कयास लावल्या जात आहेत. शरद पवार यांनी पक्षात आपली ताकद दाखवली की २०२४ साठी फिल्डींग लावली, अशी चर्चा रंगली आहे.
शरद पवारांच्या राजीनाम्याचे सहा अर्थ कोणते -
अजित पवार यांनी शरद पवार यांची राजीनाम्याचे केलेले समर्थन पाहता अनेक चर्चा रंगल्या आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची कमान सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकते, असेही बोलले जात आहे. घराणेशाही आणि पक्षात अंतर्गत कलह असल्याची चर्चा आहे. पक्ष आणि कुटुंबातील अंतर्गत कलह थांबवण्याच्या उद्देशाने शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्याचे म्हटले जात आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्यावरून मोठी राजकीय महत्त्वाकांक्षा पाहायला मिळाली. मला १०० टक्के मुख्यमंत्री व्हायचे आहे, असे ते म्हणाले होते. यासाठी २०२४ ची वाट का पाहायची? अजित यांचे हे वक्तव्य अशावेळी आले होते ज्यावेळी राष्ट्रवादीत फूट पडून ते भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. त्यामुळे शरद पवार यांनी षटकार मारले आहेत.
शरद पवार महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा आहेत. मात्र अजित पवार बंडखोरी करुन आघाडीच फूट पाडू शकतात. अशा स्थितीत २०२४ साठी नव्या युतीचा मार्ग खुला करण्यासाठी शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाला महाविकास आघाडीसोबत पुढे जाण्याची जबाबदारी असेल. भविष्यातील नवीन युतीची जबाबदारी देखील अध्यक्षांवर असेल.
गेल्या वर्षी शरद पवार पुन्हा पक्षाचे अध्यक्ष झाले. दिल्लीत झालेल्या पक्षाच्या संसदीय कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांना एकमताने ही जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर बैठकीत सहभागी असलेले अजित पवार अचानक तेथून निघून गेल्याचेही समोर आले होते. शरद पवार सलग २४ वर्षे पक्षाचे अध्यक्ष आहेत. आता अचानक पद सोडणे म्हणजे प्रकरण गांभीर्याकडे बोट दाखवत आहे.
आता जबाबदारी नव्या पिढीवर द्यावी, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. अशा स्थितीत शरद पवारांच्या या वक्तव्याचे मोठे संकेत असल्याचे मानले जात आहे. पवारांच्या माघाराचे राजकीय परिणाम होऊ शकतात.
शरद पवार हे अनुभवी नेते आहेत. राजीनाम्याची घोषणा करून त्यांनी पक्ष आणि कुटुंबातील अंतर्गत वादाचाही मोठा संदेश दिला आहे. विरोधकांमध्ये पवारांनी ताकद दाखवल्याचे बोलले जात आहे. पवार यांच्या राजीनाम्याची घोषणा झाल्यानंतर सर्वच नेत्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्यास सांगितले. एवढेच नाही तर कार्यकर्तेही संतप्त झाले असून कार्यालयात निदर्शने करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.