Sharad Pawar Resigns : शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत सस्पेंस कायम! कमिटीच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं?

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns
Updated on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची बैठक संपली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांशी संवाद साधला. शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर महाराष्ट्रभर कार्यकर्ते आक्रमक झाले होते. दरम्यान समितीच्या बैठकित आज काय घडलं, हे जाणून घेऊया.

प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?

२ मे रोजी शरद पवार यांनी राजी राजीनामा दिला होता. त्यांनी अचानक एक महत्वाची सुचना केली होती. त्याच दिवशी त्यांनी पुढील कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड करण्यासाठी समिती नेमली होती. माला ती जबाबदारी दिली होती. समितीचा मी प्रमुख होतो. त्यांनी जे उद्गार व्यक्त केले त्यामुळे आम्ही सगळे स्तब्ध झालो होतो. शरद पवार यांच्या राजीनाम्याची आम्हाला कल्पना सुद्धा नव्हती, असे पटेल म्हणाले.

शरद पवार यांना देशातील अनेक नेत्यांनी त्यांना अध्यक्षपदी कायम राहावे म्हणून विनंती केली. शरद पवार देशातील मोठे नेते आहेत. देश, राज्य आणि पक्षाला शरद पवार यांची गरज आहे. मात्र पवारांच्या घोषणेमुळे आम्ही अवाक झालो. शरद पवार यांनी आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं नव्हत. आज समितीची बैठक झाली. एक ठराव आम्ही आज पारित केला आहे. एकमताने हा ठराव पारित करण्यात आला आहे.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns : 'राजीनामा मागे घ्या' म्हणत NCP कार्यकर्त्याचा रॉकेल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा आम्ही एकमाताने मंजूर केला आहे. त्यांनी अध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती आम्ही केली आहे. हा निर्णय आम्ही त्यांना कळवणार आहोत. शरद पवार यांचा वेळ घेऊन आम्ही त्यांची भेट घेणार आहोत. 

शरद पवारांची भूमिका महत्वाची -

समितीच्या निर्यणानंतर शरद पवार यांची भूमिका महत्वाची आहे. शरद पवार काही पर्याय सुचवतात का? की अध्यक्षपदी कायम राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

"पक्षाच्या भवितव्यासाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी नवे नेतृत्व तयार करण्याचा संबंधित निर्णय घेतला होता परंतु माझ्या घोषणेनंतर माझ्या सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांमध्ये तीव्र भावना आहे. तुमच्या भावनांचा आदर करून मी येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय घेईन. तुमच्या भावनांकडे दुर्लक्ष होणार नाही याची मी काळजी घेईन", असे शरद पवार यांनी काल स्पष्ट केले होते.

Sharad Pawar Resigns
Sharad Pawar : मोठी बातमी! शरद पवारांचा राजीनामा निवड समितीने फेटाळला!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.