Sharad Pawar Resigns: "समितीच्या बैठकीत अनेकजण गैरहजर त्यामुळं..."; प्रवक्ते तपासेंची नवी माहिती

शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यपदाचा राजीनामा दिला आहे.
Sharad Pawar
Sharad Pawar
Updated on

मुंबई : शरद पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण असेल? याबाबत आता चर्चा सुरु आहे. यासंदर्भात विशेष समितीची बैठक सध्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये सुरु आहे. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली. (Sharad Pawar Resigns National Committee will meet again tomorrow says Mahesh Tapase)

Sharad Pawar
Same Sex Marriage: LGBTQ समाजाच्या प्रश्नांबाबत मोठा निर्णय! केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

तपासे म्हणाले, अध्यक्षपदाबाबतचा सर्वस्वी निर्णय शरद पवार यांचा आहे. समितीची बैठकही सुरु आहे, पण उद्या किंवा परवा यातील ठोस भूमिका समोर येईल. सकाळपासून सुरु असलेल्या भेटींमध्ये सर्वांनी शरद पवारांना एकच विनंती केली की त्यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा.

Sharad Pawar
Supriya sule on Pathan: 'शाहरुखचा हेवा...'राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही 'पठाण'ची भुरळ...

समितीची आज बैठक झाली त्यात काही चर्चाही झाली. पण या बैठकीला आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित नव्हते. त्यामुळं उद्या पुन्हा या संदर्भात चर्चा होईल, पण महाराष्ट्रात आणि देशभरातील राष्ट्रवादीचा कार्यकर्त्याला असं वाटत नाही की शरद पवार यांनी अध्यक्षपद सोडावं. शरद पवारांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत त्यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदी कायम रहावं, अशी अनेक नेत्यांची इच्छा आहे.

Sharad Pawar
Sharad Pawar Resigns: शरद पवार आज काय निर्णय घेणार? वायबी सेंटरकडे रवाना, घडामोडींना वेग

पवारांच्या निर्णयानंतर सर्वजण शॉकमध्ये आहेत. कारण एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. हे पक्षाचं कार्यालय नव्हतं किंवा व्यासपीठंही नव्हतं, त्यामुळं ९९ टक्के कार्यकर्त्यांना याची माहिती नव्हती की शरद पवार राजीनामा देतील. पण पवारांना भेटण्यासाठी आणि बैठकीसाठी काहीजण देशभरातून येत आहेत, त्यामुळं समितीची पुन्हा एकदा बैठक होण्याची शक्यता आहे, असा पुनरुच्चार तपासे यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.