Sharad Pawar : निवृत्ती मागे घेतली पण पवारांच्या मनातला अध्यक्ष कोण? पत्रकार परिषदेत...

 Sharad Pawar
Sharad Pawar Esakal
Updated on

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर निवृत्तीचा निर्णय मागे घेतला आहे. राज्यात चार दिवसांपासून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा सुरु असलेला गदारोळ शांत झाला.

शरद पवार यांनी २ मे रोजी निवृत्तीची घोषणा केली होती. तिथल्या तिथेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या भूमिकेला विरोध केला. कोणी रडत होत, कोणी आरडाओरड करत होतं तर कोणी घोषणा देत होतं. त्यामुळे या निर्णयावर विचार करण्यासाठी पवारांनी तीन दिवसांचा वेळ मागितला होता.

 Sharad Pawar
Sharad Pawar Withdraw Resignation : शरद पवारांनी पत्रकार परिषदेत मागीतली माफी; म्हणाले, फक्त अजित पवारांना...

तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुंबईतच ठाण मांडून होते. अनेक राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केल्याची माहिती आहे. शिवाय देशभरातून अनेक पदाधिकाऱ्यांनी फेरविचार करुन सध्या तरी तुम्हीच पदावर राहावं, अशा विनवण्या केल्या.

निवृत्तीचा निर्णय मागे

आज शरद पवारांनी वाय. बी. सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेऊन निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं. मात्र संघटनेमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करण्याचे संकेत पवारांनी दिले आहेत. मात्र दरम्यानच्या काळात अध्यक्ष पदासाठी सुप्रिया सुळे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील यांची नावं चर्चेत होती.

 Sharad Pawar
Wrestler Protest Sourav Ganguly : त्यांना त्यांची लढाई लढू द्या... बीसीसीआयचा माजी अध्यक्ष सौरव गांगुलीचे परखड मत

शरद पवारांनी सुचवली होती समिती

स्वतः शरद पवारांनी अध्यक्ष निवडीसाठी एक समिती गठीत करण्याचा सल्ला दिला होता आणि समितीमध्ये कोण असावं त्यांची नावंही जाहीर केली होती. त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, के. के. शर्मा, पी. सी. चाको, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, जयदेव गायकवाड, फौजिया खान, धीरज शर्मा, सोनिया दूहन या संभाव्य लोकांचा समावेश करण्याची सूचना शरद पवार यांनी केली होती.

पवारांच्या मनातला अध्यक्ष कोण?

आज शरद पवारांनी भलेही निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन अध्यक्षपदावर कायम राहण्याचा निर्णय घेतला असेल परंतु पवारांच्या मनात कुणीतरी एक राष्ट्रीय अध्यक्ष असणारच, तो कोण? असा प्रश्न आता यानिमित्ताने उपस्थित होत आहे. राजकीय जाणकार सांगतात पवारांच्या मनात नेमकं काय चाललं आहे, हे कुणालाच सांगता येत नाही, हे पुन्हा सिद्ध झालं.

'अजित पवार, सुप्रिया सुळे की प्रफुल्ल पटेल? की आणखी काहीतरी नवं? अशाच अर्थाने तर्क लावावा लागेल. सुप्रिया सुळे या त्यातल्या त्यात सक्षम उमेदवार असतील. जर पवारांनी निर्णय मागे घेतला नसता तर सुप्रिया सुळे यांच्याच नावाची चर्चा झाली असती. कारण अजित पवारांना दिल्लीत फारसा रस नाही आणि त्यांनीच ती शक्यता फेटाळून लावली. त्यामुळे पवारांच्या मनात सुप्रिया असतील', असं राजकीय जाणकार सांगतात. आजच्या पत्रकार परिषदेत मात्र पवारांनी त्याबाबत कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.