ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्षाचं अध्यक्षपद सोडल्यानंतर त्यांचा वारसा कोण चालवणार? असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, अजित पवार की सुप्रिया सुळे, अशी चर्चा रंगली असतानाच माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप करत मोठं वक्तव्य केलं आहे. (Sharad Pawar Resigns Shalinitai Patil allegations against Ajit Pawar)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात राजकीय निवृत्तीची घोषणा केली. त्यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांची नावं अध्यक्षपदासाठी आघाडीवर आलीत. मात्र, शालिनीताई पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना पसंती देत अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. अशी टीका केली आहे.
काय म्हणाल्या शालिनीताई पाटील ?
शरद पवार माझ्यापेक्षा १० वर्षांनी लहान आहेत. मी अजूनही कामकाज सांभाळत. त्यामुळे शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय खुप घाईत घेतला. असं मत शालिनीताई पाटील यांनी शरद पवार यांच्या निर्णयावर व्यक्त केलं.
तसेच अजित पवार घोटाळेबाज आणि गुन्ह्यामध्ये अडकलेले नेते आहेत. त्यांना कधीही अटक होऊ शकते. त्यामुळे त्यांना अध्यक्षपद देणं चुकीचं ठरेलं. अशी टीकाही शालिनीताई पाटील यांनी केली आहे.
अजित पवार यांच्या पाठीशी भाजपच्या मोठ्या नेत्याचा हात आहे. म्हणून ईडीकडून अद्याप त्यांची चौकशी झाली नाही. हसन मुश्रीफ यांची चौकशी केली जाते मग चौदाशे कोटी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अजित पवार यांना चौकशीसाठी का बोलावलं जात नाही? असा सवाल उपस्थित केला.
यासोबतच, अध्यक्षपदाबाबत बोलताना राष्ट्रवादीचा अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनाच बनवाव असं मतही शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केलं.
शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पवार यांनी फेरविचार करावा अशी मागणी केली आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.